मोहोळमध्ये 15 दिव्यांग, 99 ज्येष्ठांचे घरी जाऊन मतदान:237 जण पात्र मतदार, आजही घरोघरी जाऊन घेण्यात येणार मतदान

मोहोळमध्ये 15 दिव्यांग, 99 ज्येष्ठांचे घरी जाऊन मतदान:237 जण पात्र मतदार, आजही घरोघरी जाऊन घेण्यात येणार मतदान

मोहोळ विधानसभा मतदारसंघात शनिवारपासून दिव्यांग आणि ८५ वर्षावरील ज्येष्ठ मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. दोन दिवस पात्र मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. पहिल्या दिवशी १५ दिव्यांग आणि ९९ ज्येष्ठ मतदार असे ११४ जणांचे मतदान घेण्यात आले. मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये २३७ होम वोटिंग पात्र मतदार आहेत. त्यापैकी ३० दिव्यांग,८५ वर्षावरील २०७ मतदार आहेत. या पात्र मतदारांची ग्रहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया ९,१० नोव्हेंबर दोन दिवस होणार आहे. शनिवारी पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून १०६ ज्येष्ठ व १६ दिव्यांग अशा एकूण १२२ जनासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी दिव्यांग १५ तर ८५ वर्षावरील ९९ अशा एकूण ११४ व्यक्तीने मतदान केले. तर उर्वरित आठ व्यक्तींचे परगावी गेल्याने मतदान होऊ शकले नाही. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया दोन नोडल अधिकारी,७० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवण्यात आली. मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी निवडणूक नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, निवडणूक नायब तहसीलदार अनिल शहापुरे, नोडल अधिकारी डॉ. योगेश डोके,नोडल अधिकारी प्रकाश कांबळे आदींनी काम पाहिले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment