मतदानाचा कौल बदलणारे 18% लोकच ठरवतात दिल्लीचे सरकार:लाेकसभा-विधानसभेत केवळ 9 महिन्यांचे अंतर, तरीही हाच ट्रेंड

दिल्लीत प्रत्येक वेळी लोकसभेच्या ९ महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होते. मात्र, इतक्या कमी कालावधीतही इथल्या मतदारांचा कौल बदलतो. गेल्या ३ विधानसभा व ३ लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर सरासरी १८% फिरणारी मतेच दिल्लीची सत्ता ठरवतात. २०१४ च्या लोकसभेला भाजपने सर्व ७ जागा जिंकल्या व ७० पैकी ६० विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली. मात्र, २०१५ विधानसभेत भाजपला तीनच व ‘आप’ला ६७ जागा मिळाल्या. २०१९ मध्ये पुन्हा भाजपचे सर्व खासदार विजयी झाले. ६५ विधानसभेत आघाडी घेतली. २०२० विधानसभेत मात्र आपने ६२ जागा जिंकल्या. २०२४ लोकसभेत भाजपने सर्व जागा जिंकल्या. ५२ विधानसभेत आघाडी घेतली आहे. ज्यांची जितकी मते घटली, तिसऱ्याची तितकीच वाढली २०१४ च्या लोकसभेच्या तुलनेत २०१५ च्या विधानसभेत आम आदमी पक्षाच्या मतांमध्ये २१.६% वाढ झाली. भाजपच्या मतांमध्ये १४.१% व काँग्रेसच्या ५.४% ने घट झाली. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०२० विधानसभेत ‘आप’च्या मतांची टक्केवारी ३६.४% ने वाढली. भाजपच्या मतांत १८.१% व काँग्रेसच्या मतांमध्ये १८.२% घट झाली. दोन्ही वेळा भाजप व काँग्रेसची जितकी मते घटली, तितकीच ‘आप’ची वाढली. असे समजूया… सरकार स्थापनेत स्विंग मतांची भूमिका गेल्या तीन लोकसभा निवडणुकांत भाजपने दिल्लीत एकतर्फी विजय मि‌ळवला. तर आम आदमी पक्षाने विधानसभा निवडणुकीत जवळपास तितकीच मते घेऊन एकतर्फी जिंकत आली. काँग्रेस पक्ष २०१३ नंतर विधानसभेत १०% मतेही घेऊ शकलेला नाही. आता दिल्लीचा नंबर: ५ फेब्रुवारीला मतदान, ८ ला निकाल दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगूल मंगळवारी वाजला. एकूण ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होईल. ८ फेब्रुवारीला निकाल येईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, २ लाख मतदार असून १२ मतदारसंघ राखीव आहेत. ईव्हीएम हॅकच्या आरोपांवर ते म्हणाले ‘ते हॅक होऊ शकत नाही, असे न्यायालयांनी ४२ वेळा सांगितले. आम्ही प्रत्येक मतदारसंघातील ५ व्हीव्हीपॅटची मोजणी करतो. आतापर्यंत ६७,००० व्हीव्हीपॅट तपासल्या. कोणतीच विसंगती आढळली नाही.’ ५ फेब्रुवारी रोजीच उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर, तामिळनाडूतील इरोड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment