प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशांवर माथेफिरूचा हल्ला:2 ठार, 3 गंभीर; नागपूर रेल्वे स्थानकावरील भयंकर घटना, आरोपीला बेड्या

येथील मुख्य रेल्वे स्थानकावग्रील फलाट क्र. 6 वर झोपलेल्या 5 प्रवाशांवर एका माथेफिरूने हल्ला केला. त्यात 2 जागीच ठार झाले असून, 3 जण गंभीर जखमी झालेत. मुख्य रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 6 वर पहाटे 3.30 च्या सुमारास ही भयंकर घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जयराम रामअवतार केवट असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांकावर 6 वर काही प्रवासी रेल्वेची वाट पाहत होते. तेव्हा अचानक जयराम केवट नामक माथेफिरूने लाकडी राफ्टरने त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. पण नंतर माथेफिरूने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. जयराम केवटने लाकडी राफ्टरने केलेल्या हल्ल्यात 2 प्रवासी ठार झाले. तर 3 गंभीर जखमी झाले आहेत. हा आरोपी फलाटावर दिसेल त्या प्रवाशाला मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफ्टरने त्याने हा गुन्हा केला. गणेश कुमार डी (54, दिंडीगुल, तामिळनाडू) असे एका मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. ती पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपीने या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पण कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच हल्लकल्लोळ माजला होता. हा प्रकार पाहून रेल्वेस्टेशनवर आलेले प्रवाशी जिवाच्या आकांताने सैरभैर पळत होते.

​येथील मुख्य रेल्वे स्थानकावग्रील फलाट क्र. 6 वर झोपलेल्या 5 प्रवाशांवर एका माथेफिरूने हल्ला केला. त्यात 2 जागीच ठार झाले असून, 3 जण गंभीर जखमी झालेत. मुख्य रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 6 वर पहाटे 3.30 च्या सुमारास ही भयंकर घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जयराम रामअवतार केवट असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांकावर 6 वर काही प्रवासी रेल्वेची वाट पाहत होते. तेव्हा अचानक जयराम केवट नामक माथेफिरूने लाकडी राफ्टरने त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. पण नंतर माथेफिरूने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. जयराम केवटने लाकडी राफ्टरने केलेल्या हल्ल्यात 2 प्रवासी ठार झाले. तर 3 गंभीर जखमी झाले आहेत. हा आरोपी फलाटावर दिसेल त्या प्रवाशाला मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफ्टरने त्याने हा गुन्हा केला. गणेश कुमार डी (54, दिंडीगुल, तामिळनाडू) असे एका मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. ती पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपीने या हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. पण कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच हल्लकल्लोळ माजला होता. हा प्रकार पाहून रेल्वेस्टेशनवर आलेले प्रवाशी जिवाच्या आकांताने सैरभैर पळत होते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment