Monthly Archive: October, 2024

रिझर्व्हेशनचे स्पेलिंगही न येणारे शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गंभीर आरोप

रिझर्व्हेशनचे स्पेलिंगही न येणारे शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गंभीर आरोप

सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके या विषयी जनजागरण करीत आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या हाके यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना रिझर्व्हेशनचे स्पेलिंगही न येणारे डझनभर मंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळात असल्याची टीका केली. ओबीसी असंघटीत आहे. याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही, असे कोणी समजू नये. नालायक लोक विधानसभेत असतील तर आम्ही विधानसभेत लायक माणसे पाठवू. संवैधानिक तत्त्वावर बोलणारी माणसे पाठवू, असे लक्ष्मण हाके म्हणाले. उद्या मुंबईला जाणार आहोत. आम्ही काही लोकांची यादी केली आहे. त्यांच्या मतदारसंघात काम करणार आहोत. काही आयटी कंपन्यांसोबत बोललो आहे. १०० मतदारसंघातील लोकांची मते जाणून घेतली. आम्ही प्रॅक्टिकल काम करतो फक्त बोलत नाही. जातीनिहाय सर्वपक्षीय १०० लोकांची यादी तयार आहे. जरांगेला रसद पुरविली, पाठिंबा दिला, त्यांना ओबीसी समाज पाडणार आहे, असा इशाराही हाके यांनी दिला. राजेश टोपेंवर टीकास्त्र रोहित पवार कर्जत जामखेडमधून निवडून आले. राजेश टोपे घनसावंगीतून निवडून येतात. तिथे ओबीसींची संख्या किती आहे याची माहिती घ्यावी. ओबीसींनी त्यांना मतदान केले नाही काय? यांना फक्त जरांगे दिसतात का? असा सवाल हाके यांनी केला आहे. नेते लोकप्रितनिधी होण्यात, आमदार खासदार होण्यात ओबीसी जनतेचाही वाटा आहे. चंद्रशेखर बावनकुळे स्वत: ला ओबीसी नेते म्हणून घेतात. पण ओबीसी आरक्षण जात असताना ते बोलत नाहीत. त्यांना आता लोक दारात उभे करणार नाही, असा घणाघात हाके यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला आहे.

​सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके या विषयी जनजागरण करीत आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या हाके यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना रिझर्व्हेशनचे स्पेलिंगही न येणारे डझनभर मंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळात असल्याची टीका केली. ओबीसी असंघटीत आहे. याचा अर्थ ओबीसीला काही कळत नाही, असे कोणी समजू नये. नालायक लोक विधानसभेत असतील तर आम्ही विधानसभेत लायक माणसे पाठवू. संवैधानिक तत्त्वावर बोलणारी माणसे पाठवू, असे लक्ष्मण हाके म्हणाले. उद्या मुंबईला जाणार आहोत. आम्ही काही लोकांची यादी केली आहे. त्यांच्या मतदारसंघात काम करणार आहोत. काही आयटी कंपन्यांसोबत बोललो आहे. १०० मतदारसंघातील लोकांची मते जाणून घेतली. आम्ही प्रॅक्टिकल काम करतो फक्त बोलत नाही. जातीनिहाय सर्वपक्षीय १०० लोकांची यादी तयार आहे. जरांगेला रसद पुरविली, पाठिंबा दिला, त्यांना ओबीसी समाज पाडणार आहे, असा इशाराही हाके यांनी दिला. राजेश टोपेंवर टीकास्त्र रोहित पवार कर्जत जामखेडमधून निवडून आले. राजेश टोपे घनसावंगीतून निवडून येतात. तिथे ओबीसींची संख्या किती आहे याची माहिती घ्यावी. ओबीसींनी त्यांना मतदान केले नाही काय? यांना फक्त जरांगे दिसतात का? असा सवाल हाके यांनी केला आहे. नेते लोकप्रितनिधी होण्यात, आमदार खासदार होण्यात ओबीसी जनतेचाही वाटा आहे. चंद्रशेखर बावनकुळे स्वत: ला ओबीसी नेते म्हणून घेतात. पण ओबीसी आरक्षण जात असताना ते बोलत नाहीत. त्यांना आता लोक दारात उभे करणार नाही, असा घणाघात हाके यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला आहे.  

पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी:ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाला मारहाणीनंतर प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया

पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी:ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाला मारहाणीनंतर प्रताप पाटील चिखलीकरांची प्रतिक्रिया

नांदेडच्या लोहा येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपतालुकाप्रमुख संतोष वडवळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली होती. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविषयी नाव न घेता आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याच्या कारणाने ही मारहाण केल्याचा आरोप संतोष वडवळे यांनी केला आहे. या प्रकरणावर माजी खासदार प्रताप पाटील चिकलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी खासदार प्रताप पाटील चिकलीकर म्हणाले, मी मारहाणीचे समर्थन करत नाही. पण पोस्ट टाकताना आपली पात्रता आणि समोरच्या नेत्याची उंची पाहिली पाहिजे. मारहाण करणे चुकीचे आहे. ज्यांनी मारहाण केली त्यांना मी समज देतो, असे ते म्हणाले. मी चार दिवसांपासून मुंबईत आणि प्रवीण चिखलीकर कुबेरला आहेत. आमची नावे घेतली गेली यात तथ्य नाही, असेही प्रताप पाटील चिखलीकरांनी स्पष्ट केले आहे. नेमके प्रकरण काय?
लोहा येथील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून वडवळे यांचे अपहरण केले व एका फार्म हाऊसवर नेऊन बेदम मारहाण केली, असा आरोप करण्यात येत आहे. या मारहाणीत त्यांचे एक बोट देखील छटले असल्याचे समोर आले. फार्म हाऊसवर नेऊन दारूची बॉटल डोक्यावर ठेवत वडवळे यांना नाचायला लावले. तसेच फेसबुक पोस्ट केल्याबद्दल माफी मागायला लावली. या सगळ्या प्रकारानंतर वडवळे यांना एका रुग्णालयात टाकून आरोपी पसार झाले होते. संतोष वडवळेवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
संतोष वडवळे यांच्यावर 1 ऑक्टोबर रोजी मारहाण झाली होती. त्याच दिवशी घटना घडण्यापूर्वी संतोष वडवळे यांनी बालाजी कोकरे यांना संतोष व त्यांच्या वडील व भावाने जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप कोकरे यांनी केला आहे. तसेच मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन आणि अंगठी काढून घेतली. या आरोपावरून 3 ऑक्टोबर रोजी फिर्यादी बालाजी कोकरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत संतोष वडवळेसह त्याच्या वाडिलांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत दरोडा, मारहाण आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​नांदेडच्या लोहा येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपतालुकाप्रमुख संतोष वडवळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली होती. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविषयी नाव न घेता आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याच्या कारणाने ही मारहाण केल्याचा आरोप संतोष वडवळे यांनी केला आहे. या प्रकरणावर माजी खासदार प्रताप पाटील चिकलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी खासदार प्रताप पाटील चिकलीकर म्हणाले, मी मारहाणीचे समर्थन करत नाही. पण पोस्ट टाकताना आपली पात्रता आणि समोरच्या नेत्याची उंची पाहिली पाहिजे. मारहाण करणे चुकीचे आहे. ज्यांनी मारहाण केली त्यांना मी समज देतो, असे ते म्हणाले. मी चार दिवसांपासून मुंबईत आणि प्रवीण चिखलीकर कुबेरला आहेत. आमची नावे घेतली गेली यात तथ्य नाही, असेही प्रताप पाटील चिखलीकरांनी स्पष्ट केले आहे. नेमके प्रकरण काय?
लोहा येथील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांनी भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून वडवळे यांचे अपहरण केले व एका फार्म हाऊसवर नेऊन बेदम मारहाण केली, असा आरोप करण्यात येत आहे. या मारहाणीत त्यांचे एक बोट देखील छटले असल्याचे समोर आले. फार्म हाऊसवर नेऊन दारूची बॉटल डोक्यावर ठेवत वडवळे यांना नाचायला लावले. तसेच फेसबुक पोस्ट केल्याबद्दल माफी मागायला लावली. या सगळ्या प्रकारानंतर वडवळे यांना एका रुग्णालयात टाकून आरोपी पसार झाले होते. संतोष वडवळेवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
संतोष वडवळे यांच्यावर 1 ऑक्टोबर रोजी मारहाण झाली होती. त्याच दिवशी घटना घडण्यापूर्वी संतोष वडवळे यांनी बालाजी कोकरे यांना संतोष व त्यांच्या वडील व भावाने जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप कोकरे यांनी केला आहे. तसेच मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन आणि अंगठी काढून घेतली. या आरोपावरून 3 ऑक्टोबर रोजी फिर्यादी बालाजी कोकरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत संतोष वडवळेसह त्याच्या वाडिलांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत दरोडा, मारहाण आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अब्दुल सत्तारांच्या विरोधात 50 खोकेच्या घोषणा:सभागृहातून घेतला काढता पाय, नेमके प्रकरण काय?

अब्दुल सत्तारांच्या विरोधात 50 खोकेच्या घोषणा:सभागृहातून घेतला काढता पाय, नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी पुण्यातील निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, पन्नास खोके एकदम ओक्के, अशा घोषणा देण्यात आल्या. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने येथील परिषदेत चर्चा करण्यात येणार होती. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. मात्र या कार्यक्रमाला अब्दुल सत्तार दीड तास उशिरा पोहोचले होते. अब्दुल सत्तार उशिरा पोहोचल्याने एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश देण्यात आले. प्रतिनिधि बोलत असताना तुमचे प्रश्न मांडा, वाद निर्माण होईल असे वक्तव्य करू नका, असे सांगण्यात आले. तसेच मला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. यामुळे बाजारसमितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.

​महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी पुण्यातील निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, पन्नास खोके एकदम ओक्के, अशा घोषणा देण्यात आल्या. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने येथील परिषदेत चर्चा करण्यात येणार होती. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. मात्र या कार्यक्रमाला अब्दुल सत्तार दीड तास उशिरा पोहोचले होते. अब्दुल सत्तार उशिरा पोहोचल्याने एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश देण्यात आले. प्रतिनिधि बोलत असताना तुमचे प्रश्न मांडा, वाद निर्माण होईल असे वक्तव्य करू नका, असे सांगण्यात आले. तसेच मला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. यामुळे बाजारसमितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली.  

कुमारी सैलजा अचानक सोनिया गांधींच्या भेटीला:एकटीनेच कारमधून 10 जनपथ गाठले; प्रचार संपण्यापूर्वीच भेटीने खळबळ

हरियाणात आज (3 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपण्यापूर्वी खासदार कुमारी सैलजा यांनी काँग्रेसमध्ये खळबळ उडवून दिली. गुरुवारी सकाळी सोनिया गांधींना भेटण्यासाठी त्या अचानक 10 जनपथवर पोहोचल्या. कुमारी सैलजा आणि सोनिया गांधी यांच्यात सुमारे अर्धा तास बैठक झाली. यानंतर सैलजा मीडियाशी न बोलता कारमधून निघून गेल्या. कुमारी सैलजा यांच्या या भेटीनंतर हरियाणाच्या राजकारणात आणि विशेषत: माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्या...

आरजी कर कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरच्या पुतळ्यावरून वाद:TMC म्हणाले- हे अपमानास्पद; ज्युनियर डॉक्टर म्हणाले- हे वेदनेचे प्रतीक

कोलकात्याच्या आरजी कर कॉलेजमध्ये बलात्कार-हत्या पीडित प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा पुतळा बसवण्यात आला आहे. फायबर ग्लासपासून बनवलेल्या या पुतळ्याला ‘अभया: क्राय ऑफ द अवर’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये एक महिला वेदनेने ओरडताना दाखवली आहे. या पुतळ्यावरून वाद सुरू झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी हे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या स्मृतीचा अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले ही आतापर्यंतची सर्वात वाईट...

MI केप टाऊनने हेंड्रिक्सला ₹2.7 कोटींना विकत घेतले:टेंबा बावुमा अनसोल्ड; SA20 च्या 6 फ्रँचायझींनी 13 खेळाडू खरेदी केले

दक्षिण आफ्रिकन लीग SA20 च्या तिसऱ्या हंगामासाठी लिलाव झाला. यासाठी सुमारे 200 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली होती. यापैकी लीगच्या 6 फ्रँचायझींनी 13 खरेदी केल्या आहेत. सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला मंगळवारी झालेल्या लिलावात एमआय केपटाऊनने 2.7 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचबरोबर माजी कर्णधार टेंबा बावुमाला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. SA20 चा पुढील हंगाम 9 जानेवारीपासून सुरू होईल आणि 8 फेब्रुवारीपर्यंत खेळला जाईल....

इराणी ट्रॉफीः अभिमन्यूने शतक झळकावले:तिसऱ्या दिवशी शेष भारताच्या 4 विकेट्स; मुंबईला दिले 538 धावांचे लक्ष्य

रणजी चॅम्पियन मुंबई आणि शेष भारत यांच्यातील सामना 1 ऑक्टोबरपासून लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. एकाना येथे इराणी ट्रॉफीच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना शेष भारताने 4 गडी गमावत 289 धावा केल्या. गुरुवारी 74 षटकांचा सामना खेळवण्यात आला. शेष भारताचा सलामीवीर अभिमन्यू इसवरनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 212 चेंडूत नाबाद 151 धावा केल्या आहेत. कर्णधार ऋतुराज गायकवाड 27 चेंडूत 9...

सहारनपूरमध्ये 56 वर्षांनंतर जवानावर अंत्यसंस्कार:1968 मध्ये विमान अपघातात शहीद; आई-वडील, पत्नी आणि मुलाचा झाला आहे मृत्यू

हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीत भारतीय लष्कराला 30 सप्टेंबर रोजी 4 भारतीय जवानांचे मृतदेह सापडले. यापैकी एक मृतदेह मलखान सिंग यांचा होता. बर्फात गाडल्यामुळे मृतदेहाचे नुकसान झाले नाही. मलखान सिंग सहारनपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या फतेहपूर गावचे रहिवासी होते. 56 वर्षांपूर्वी 7 फेब्रुवारी 1968 रोजी ते बेपत्ता झाले होते. त्याचे आई-वडील, पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. आता कुटुंबात फक्त नातवंडे...

डिजिटल अटकेनंतर 4 तासात शिक्षिकेचा मृत्यू:ठगाची धमकी – मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली, 1 लाख रुपयांची मागणी

आग्रा येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला 4 तास डिजिटल पद्धतीने अटक करण्यात आली. पोलिस इन्स्पेक्टरच्या गणवेशात एकाने व्हॉट्सॲप कॉल केला. तो म्हणाला, तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली आहे. तुम्हाला तिची सुटका करायची असेल तर 15 मिनिटांत 1 लाख रुपये पाठवा. अन्यथा व्हिडिओ व्हायरल होईल. यामुळे शिक्षिका नाराज झाली. त्यांनी आपल्या मुलाला एक लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, पण त्यापूर्वीच त्यांना...

अयोध्येत राम मंदिराच्या शिखराचे बांधकाम सुरू:4 महिन्यांत तयार होणार, दर्शनावर परिणाम नाही; शीर्षस्थानी धर्मध्वज असेल

राम मंदिराच्या शिखराच्या उभारणीला आजपासून सुरुवात झाली. ते 120 दिवसांत (4 महिने) तयार होईल. यानंतर मंदिराची एकूण उंची 161 फूट होईल. शीर्षस्थानी धर्मध्वज असेल. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले, बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी पूजा करण्यात आली. शिखरावरील मुख्य दगडाचे पूजन करण्यात आले. बांधकामाचा वेग चांगला आहे. कामे वेळेत पूर्ण होतील. अभियंत्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. नगर...