Monthly Archive: October, 2024

सरकारी नोकरी:कॅनरा बँकेत 3000 पदांवर भरती, 4 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती

कॅनरा बँकेने पदवीधर शिकाऊ पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर निश्चित आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट canarabank.com वर जाऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: स्टायपेंड: 15 हजार रुपये दरमहा. शुल्क: महत्त्वाची कागदपत्रे: याप्रमाणे अर्ज करा: अधिकृत सूचना लिंक ऑनलाइन अर्ज लिंक

मणिपूरमध्ये 6 दिवस ओलीस ठेवलेल्या 2 मैतेई तरुणांची सुटका:मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; सैन्य भरतीसाठी गेले होते, चुकून कुकी परिसरात शिरले

मणिपूरमधील कांगपोकपी येथून 27 सप्टेंबर रोजी कुकी अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या दोन तरुणांची सुटका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी गुरुवारी, 3 ऑक्टोबर रोजी X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. दोन्ही तरुण पोलिसांच्या ताब्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मणिपूर विद्यापीठातून एमए केलेले 22 वर्षीय ओइनम थोइथोई, निंगोम्बम जॉन्सन आणि थोकचोम थोईबा या दोन मित्रांसह इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील न्यू किथेलमंबी...

ईशा फाउंडेशनच्या चौकशीवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती:मद्रास हायकोर्टाने पोलिसांना शोध घेण्यास सांगितले होते; मुलींना ओलीस ठेवल्याचा आरोप

ईशा फाऊंडेशनविरोधातील पोलिस तपासाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव आहेत. निवृत्त प्राध्यापक एस कामराज यांनी फाऊंडेशनच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या मुली लता आणि गीता यांना आश्रमात ओलीस ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. मद्रास उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी सांगितले होते की, पोलिसांनी ईशा फाऊंडेशनशी संबंधित सर्व गुन्हेगारी प्रकरणांचे...

​​​​​​​गुणरत्न सदावर्ते वरळी विधानसभा लढणार:आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्याचा केला निर्धार, सत्ताधारी महायुतीकडे मागितली उमेदवारी

​​​​​​​गुणरत्न सदावर्ते वरळी विधानसभा लढणार:आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्याचा केला निर्धार, सत्ताधारी महायुतीकडे मागितली उमेदवारी

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. मी वरळीतून निवडणूक लढवणार असून, आदित्य ठाकरे यांना पराभवाची धूळ चारण्याचा माझा निर्धार आहे, असे त्यांनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकल्या गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्यासाठी माझी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा आहे. माझी ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्या कानावर मी माझ्या भावना टाकल्या आहेत. मी वरळीतून लढलो तर मला 25 हजारांहून अधिक लीड मिळेल. यामुळे आदित्य ठाकरे यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. मी आतापर्यंत केव्हाच शरद पवारांना घाबरलो नाही. उद्धव ठाकरेंना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना मी सहजपणे उडवून लावले. त्यामुळे महायुती माझ्या नावाचा विचार नक्कीच करेल असा विश्वास आहे. मी वरळी येथील जिजामाता नगरमधील 8 हजार झोपडपट्टीवासियांचा विकास करेन. त्यांना 600 चौरस फुटांचे घर देईल. एक मोठा विकास मी तिथे करून दाखवेन. ‘शिवनेरी सुंदरी’ नको ‘माता रमाई’ योजना काढा गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी महायुती सरकारच्या शिवनेरी सुंदरी योजनेवरही निशाणा साधला. त्यांनी यासंबंधी एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, भरत गोगावले यांना मी एवढेच सांगेन की, त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे त्यांना एसटी महामंडळामध्ये क्रांती करायची असेल, तर त्यांनी 7 वा वेतन आयोग लागू करावा. त्यातून आमच्या महिला भगिनींना न्याय द्यावा. आमच्या वाहकांवर ज्या छोट्या – मोठ्या कारवाया होतात, तो जीआर त्यांनी हाणून पाडावा. आमच्या महिला या सक्षम आहेत. त्या भिमाईच्या स्वरूप आहेत. रमाईच्या स्वरूप आहेत. माता जिजाऊच्या स्वरूप आहेत. त्यामुळे शिवनेरी सुंदरी ही योजना न काढता गोगावले यांनी माता रमाई ही योजना काढावी. महिलांना सशक्त बनवावे. हे ही वाचा… मनोज जरांगे यांचे फडणवीसांना आव्हान:मराठ्यांना डावलून निवडणूक घेतली तर पश्चात्ताप होईल, तुमचे सगळे गणित बिघडवून टाकू छत्रपती संभाजीनगर – मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिकांयचे जे तुम्ही गणिते केले ते सर्वच्या सर्व फेल गेले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये आलेला हा सर्वांत मोठा पश्चताप असणार आहे. मराठ्यांनी आता शहाणेहोण्याची गरज आहे. आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिले नाही तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकेन असे म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर

​आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. मी वरळीतून निवडणूक लढवणार असून, आदित्य ठाकरे यांना पराभवाची धूळ चारण्याचा माझा निर्धार आहे, असे त्यांनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकल्या गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना धूळ चारण्यासाठी माझी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा आहे. माझी ही इच्छा मी पक्षश्रेष्ठींना कळवली आहे. मी ज्या विचारांच्या लोकांसाठी काम करत आहे, त्यांच्या कानावर मी माझ्या भावना टाकल्या आहेत. मी वरळीतून लढलो तर मला 25 हजारांहून अधिक लीड मिळेल. यामुळे आदित्य ठाकरे यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. मी आतापर्यंत केव्हाच शरद पवारांना घाबरलो नाही. उद्धव ठाकरेंना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना मी सहजपणे उडवून लावले. त्यामुळे महायुती माझ्या नावाचा विचार नक्कीच करेल असा विश्वास आहे. मी वरळी येथील जिजामाता नगरमधील 8 हजार झोपडपट्टीवासियांचा विकास करेन. त्यांना 600 चौरस फुटांचे घर देईल. एक मोठा विकास मी तिथे करून दाखवेन. ‘शिवनेरी सुंदरी’ नको ‘माता रमाई’ योजना काढा गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी महायुती सरकारच्या शिवनेरी सुंदरी योजनेवरही निशाणा साधला. त्यांनी यासंबंधी एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, भरत गोगावले यांना मी एवढेच सांगेन की, त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे त्यांना एसटी महामंडळामध्ये क्रांती करायची असेल, तर त्यांनी 7 वा वेतन आयोग लागू करावा. त्यातून आमच्या महिला भगिनींना न्याय द्यावा. आमच्या वाहकांवर ज्या छोट्या – मोठ्या कारवाया होतात, तो जीआर त्यांनी हाणून पाडावा. आमच्या महिला या सक्षम आहेत. त्या भिमाईच्या स्वरूप आहेत. रमाईच्या स्वरूप आहेत. माता जिजाऊच्या स्वरूप आहेत. त्यामुळे शिवनेरी सुंदरी ही योजना न काढता गोगावले यांनी माता रमाई ही योजना काढावी. महिलांना सशक्त बनवावे. हे ही वाचा… मनोज जरांगे यांचे फडणवीसांना आव्हान:मराठ्यांना डावलून निवडणूक घेतली तर पश्चात्ताप होईल, तुमचे सगळे गणित बिघडवून टाकू छत्रपती संभाजीनगर – मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिकांयचे जे तुम्ही गणिते केले ते सर्वच्या सर्व फेल गेले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये आलेला हा सर्वांत मोठा पश्चताप असणार आहे. मराठ्यांनी आता शहाणेहोण्याची गरज आहे. आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिले नाही तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकेन असे म्हणत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर  

अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार:अमित शहांशी चर्चा करणार, अजित पवारांची माहिती

अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरुन 14 वर करण्याचा विचार:अमित शहांशी चर्चा करणार, अजित पवारांची माहिती

गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचा वापर हाेत असल्याने अल्पवयीन आराेपींचे वय 18 वरुन 14 करण्याचा सध्या विचार सुरू आहे. अल्पवयीन आराेपींच्या वयाचे निकष बदलण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाेबत देखील चर्चा करणार असून त्यांना याबाबतचे लेखी पत्र देणार आहे. आत्ताच्या काळात जन्मास येणारी मुले ही जन्मत:च हुशार असून त्यांना वेगवेगळे प्रश्न कमी वयातच पडत असताना पाहवयास मिळतात. 17 वर्षीय आराेपींना माहिती असते आपण कायद्यात अडकत नाही. 15, 16 वयागेटातील मुलांची देखील तीच परिस्थितीआहे. त्यामुळे हे वय 14 करण्यात यावे याबाबत आम्ही आग्रही आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी व्यक्त केले. पवार म्हणाले, अल्पवयीन आराेपींचे वयाचे निकष बदलून ते वय 14 पर्यंत कमी करावे त्यामुळे बालगुन्हेगारीस चाप बसेल. 17 वर्षीय मुलांना आपल्या चुकांमुळे कमी वय असल्याने आपण अडकू शकत नाही याची माहिती असते त्यामुळेच वय कमी करण्याबाबतचा कायदा करण्यात यावा. अमित शहा यांना मी काल वेगळया विषयावर भेटलाे असून पुन्हा काेणत्या कारणास्तव दिल्लीस जाऊन मी त्यांना भेटल्यावर याबाबत सांगणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील सांगणार असून त्याबाबतचे पत्र देणार आहे. बारामतीत महाविद्यायात तरुणाचा झालेल्या खुनाचे पार्श्वभूमीवर त्यांनीपोलिसअधिकाऱ्यांशी सकाळी सहा ते सात दरम्यान बैठक घेऊन अशाप्रकारे घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. महिला सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय यात घेण्यात आला. महिला, मुली छेडछाड विराेधात शाळा, काॅलेज, आॅफीस तसेच महत्वपूर्ण ठिकाणी काही अडचणी असतील तर तक्रार पेटया बसवल्या जाव्यात. तक्रारदाराचे नाव गाेपनीय राहील. एक काॅल प्राेब्लेम साॅल्वह (9209394917) नावाची हेल्पलाईन 24 तास बारामतीत चालू करण्यात येणार आहे. गुन्हेगारी घटना राेखण्यासाठी प्रबाेधन करण्याची गरज आहे. अवैध शस्त्र, अंमली पदार्थ काेणाकडे मिळून आल्यास कठाेर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शक्ती कक्ष माध्यमातून महिलांना भयमुक्त वातावरणात त्यांचे समुपदेशन करुन तक्रारी निवारण करण्यात येईल.

​गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचा वापर हाेत असल्याने अल्पवयीन आराेपींचे वय 18 वरुन 14 करण्याचा सध्या विचार सुरू आहे. अल्पवयीन आराेपींच्या वयाचे निकष बदलण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाेबत देखील चर्चा करणार असून त्यांना याबाबतचे लेखी पत्र देणार आहे. आत्ताच्या काळात जन्मास येणारी मुले ही जन्मत:च हुशार असून त्यांना वेगवेगळे प्रश्न कमी वयातच पडत असताना पाहवयास मिळतात. 17 वर्षीय आराेपींना माहिती असते आपण कायद्यात अडकत नाही. 15, 16 वयागेटातील मुलांची देखील तीच परिस्थितीआहे. त्यामुळे हे वय 14 करण्यात यावे याबाबत आम्ही आग्रही आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी व्यक्त केले. पवार म्हणाले, अल्पवयीन आराेपींचे वयाचे निकष बदलून ते वय 14 पर्यंत कमी करावे त्यामुळे बालगुन्हेगारीस चाप बसेल. 17 वर्षीय मुलांना आपल्या चुकांमुळे कमी वय असल्याने आपण अडकू शकत नाही याची माहिती असते त्यामुळेच वय कमी करण्याबाबतचा कायदा करण्यात यावा. अमित शहा यांना मी काल वेगळया विषयावर भेटलाे असून पुन्हा काेणत्या कारणास्तव दिल्लीस जाऊन मी त्यांना भेटल्यावर याबाबत सांगणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील सांगणार असून त्याबाबतचे पत्र देणार आहे. बारामतीत महाविद्यायात तरुणाचा झालेल्या खुनाचे पार्श्वभूमीवर त्यांनीपोलिसअधिकाऱ्यांशी सकाळी सहा ते सात दरम्यान बैठक घेऊन अशाप्रकारे घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. महिला सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय यात घेण्यात आला. महिला, मुली छेडछाड विराेधात शाळा, काॅलेज, आॅफीस तसेच महत्वपूर्ण ठिकाणी काही अडचणी असतील तर तक्रार पेटया बसवल्या जाव्यात. तक्रारदाराचे नाव गाेपनीय राहील. एक काॅल प्राेब्लेम साॅल्वह (9209394917) नावाची हेल्पलाईन 24 तास बारामतीत चालू करण्यात येणार आहे. गुन्हेगारी घटना राेखण्यासाठी प्रबाेधन करण्याची गरज आहे. अवैध शस्त्र, अंमली पदार्थ काेणाकडे मिळून आल्यास कठाेर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शक्ती कक्ष माध्यमातून महिलांना भयमुक्त वातावरणात त्यांचे समुपदेशन करुन तक्रारी निवारण करण्यात येईल.  

सरकारी नोकरी:कॅनरा बँकेत 3000 पदांवर भरती, 4 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती

कॅनरा बँकेने पदवीधर शिकाऊ पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर निश्चित आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट canarabank.com वर जाऊन अर्ज करू शकतात. श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: स्टायपेंड: 15 हजार रुपये दरमहा. शुल्क: महत्त्वाची कागदपत्रे: याप्रमाणे अर्ज करा: अधिकृत सूचना लिंक ऑनलाइन अर्ज लिंक

दिल्लीचे माजी CM केजरीवाल मुख्यमंत्री निवास रिकामे करणार:लुटियन्स दिल्लीत फायनल केले घर, 4 ऑक्टोबर रोजी शिफ्ट होतील

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी नवी दिल्लीतील मंडी हाऊस भागातील घर निश्चित करण्यात आले आहे. ते 4 ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवास रिकामे करून नवीन घरात स्थलांतरित होतील. आम आदमी पार्टीने (आप) बुधवारी ही माहिती दिली. यापूर्वी केजरीवाल यांनी नवरात्रीच्या काळात मुख्यमंत्री निवास रिकामे करणार असल्याचे सांगितले होते. पक्षाने म्हटले आहे की केजरीवाल मंडी हाऊसजवळील फिरोजशाह रोडवरील आप राज्यसभा...

नोकरी शोधताय, ही बातमी वाचाच:ड्राफ्ट्समनसह 194 पदांसाठी भरती सुरू, वयोमर्यादा 42 वर्षे, पगार 1 लाखापेक्षा जास्त

उत्तराखंडमध्ये ड्राफ्ट्समन, तंत्रज्ञ, प्लंबर यासह विविध पदांसाठी भरती आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट sssc.uk.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तब्बल 194 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून, 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येईल. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: पदानुसार 10वी/12वी/आयटीआय/डिप्लोमा पास. वयोमर्यादा: शुल्क: निवड प्रक्रिया: पगार: 19,900 रुपये – 1,12,400 रुपये प्रति...

सरकारी नोकरी:RRB रेल्वेमध्ये 14298 पदांसाठी भरती सुरू, 92 हजारांपेक्षा जास्त पगार, घ्या जाणून सविस्तर

RRB ने रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड टेक्निशियन भरतीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार RRB rrbcdg.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. यापूर्वी, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 पर्यंत सुरू होती आणि 9144 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. नंतर भरती...

सचिन तेंडुलकर पुन्हा मैदानात उतरणार:आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये चौकार-षटकार मारणार; बहुराष्ट्रीय स्पर्धा भारतातील 3 शहरांमध्ये होणार

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानावर आपली कला दाखवताना दिसणार आहे. तो आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगमध्ये (आयएमएल) भारताकडून खेळताना दिसणार आहे. IML चा पहिला सीझन यावर्षी भारतातील मुंबई, रायपूर आणि लखनऊ या तीन शहरांमध्ये होणार आहे. ज्यांच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. गावसकर लीग कमिशनर झाले मुंबई आणि भारतीय क्रिकेटचे दोन स्टार सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या पुढाकाराने IML सुरू...