Monthly Archive: October, 2024

छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई:या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला मिर्झापूरमधून अटक; 3 दिवसांची पोलिस कोठडी

छत्रपतींचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई:या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला मिर्झापूरमधून अटक; 3 दिवसांची पोलिस कोठडी

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणाची राज्यभरात चांगलीच चर्चा झाली होती. या प्रकरणानंतर राज्य सरकारच्या वतीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. परमेश्वर यादव असे या आरोपीचे नाव असून यादव याने या पुतळ्याचे वेल्डिंग नीट केले नसल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मधील मिर्जापुर येथून यादव...

भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी – निम्मा किवी संघ पॅव्हेलियनमध्ये परतला:डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल बाद, बुमराहला विकेट मिळाली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरू येथे खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याचा तिसरा दिवस असून पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 5 गड्यांच्या मोबदल्यात 209 धावा केल्या आहेत. रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स क्रीजवर आहेत. टॉम ब्लंडेल 5 धावा करून बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. डॅरिल मिशेल (18 धावा) मोहम्मद...

काँग्रेसचे राज्यातील नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत:जागांचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधींशी चर्चा करणार, संजय राऊत यांची माहिती

काँग्रेसचे राज्यातील नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत:जागांचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधींशी चर्चा करणार, संजय राऊत यांची माहिती

जागावाटपाच्या रखडलेल्या निर्णयाला गती मिळाली पाहिजे. महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नेते नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्हाला महाराष्ट्राचा जास्त अनुभव आहे. भापज विरोधात कसे लढायचे हे आम्हाला माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले. आमच्यामध्ये जवळपास बऱ्याच जागांमध्ये सहमती झाली असून काही जागांचा तिढा आहे. याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. राहुल गांधी यांच्याही बोलणार आहे. काही जागांवर अडलेली...

कोकणात भाजपला मोठा धक्का:माजी आमदार राजन तेली हाती घेणार मशाल, नारायण राणेंवर खच्चीकरण केल्याचा आरोप

कोकणात भाजपला मोठा धक्का:माजी आमदार राजन तेली हाती घेणार मशाल, नारायण राणेंवर खच्चीकरण केल्याचा आरोप

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असून आपल्या पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारी करत आहेत. अशात कोकणातील भाजपचे माजी आमदार राजन तेली हे देखील शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश करत मशाल हाती घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा नारायण राणेंसाठी धक्का मानला जात आहे. भाजपमध्ये नारायण राणे यांच्याकडून...

निवडणुकीनंतर आघाडीतील नेते एकत्र राहतील याची खात्री नाही:शिंदे गटाच्या नेत्याचे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

निवडणुकीनंतर आघाडीतील नेते एकत्र राहतील याची खात्री नाही:शिंदे गटाच्या नेत्याचे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील नेते एकत्र राहतील असे मला वाटत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडला आहे या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे केवळ निवडणुकीच्या स्वार्थासाठी हे नेते एकत्र आले असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी विरोधी महाविकास आघाडीच्या एकजुटीवर शंका व्यक्त करत निवडणुकीनंतरही एकजूट राहील...

2025 पासून JEE Mains परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल:सेक्शन बी मध्ये ऑप्शनल प्रश्न संपणार; आता सर्व 5 प्रश्न सोडवणे बंधनकारक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य 2025 चा पॅटर्न बदलला आहे. पेपरच्या विभाग ब मध्ये पर्यायी प्रश्न काढून टाकण्यात आले आहेत. आता फक्त पाच प्रश्न दिले जातील, ते सर्व सोडवणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी 10 प्रश्न देण्यात आले होते, त्यापैकी 5 प्रश्न सोडवायचे होते. NTA ने गुरुवारी (17 ऑक्टोबर) अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली. पॅटर्न का...

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला ओमर मंत्रिमंडळाची मंजुरी:मुख्यमंत्री 2 दिवसांत पंतप्रधान मोदींना भेटून मसुदा सादर करतील

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळाने जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमर दोन दिवसांत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि त्यांना प्रस्तावाचा मसुदा सादर करतील. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या प्रस्तावाला पहिल्या कॅबिनेट बैठकीतच मंजुरी दिली जाईल, असेही ओमर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान सांगितले होते....

जयपूरमध्ये RSS शी संबंधित 10 जणांवर चाकूहल्ला:मंदिरात जागरण दरम्यान हल्ला; संतप्त लोकांनी दिल्ली-अजमेर महामार्ग रोखला

जयपूरमधील मंदिरात गुरुवारी रात्री जागरण दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) 10 जणांना चाकूने हल्ला करून जखमी केले. जखमींना एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दिल्ली-अजमेर महामार्गही रोखून धरला. सल्लामसलत केल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी चक्का जाम मिटवला. करणी विहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील मंदिरात शरद पौर्णिमेनिमित्त गुरुवारी रात्री 10 वाजता जागरण कार्यक्रम होता. यानंतर खीरचा...

दिव्य मराठी अपडेट्स:भाजपची पहिली यादी आज; तर मनसेने सलग दोनदा गमावलेल्या भांडूपमधून अमित ठाकरे लढणार

दिव्य मराठी अपडेट्स:भाजपची पहिली यादी आज; तर मनसेने सलग दोनदा गमावलेल्या भांडूपमधून अमित ठाकरे लढणार

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स भाजपची पहिली यादी आज मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यात भाजपने सर्वात आधी बाजी मारली आहे. भाजपच्या केंद्रीय समितीने दिल्लीच्या बैठकीत 110 नावे निश्चित केली आहेत. त्यापैकी 50 ते 60 नावांची पहिली यादी शुक्रवारी दिल्लीतून जाहीर होईल. यात बहुतांश विद्यमान आमदारांचा समावेश...

मोफत वाळू 52 जणांनाच; तीन हजार घरकुलांची कामे वाळूअभावी रखडली:लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी पैठणमध्ये ग्रामपंचायतींचे होतेय दुर्लक्ष‎

मोफत वाळू 52 जणांनाच; तीन हजार घरकुलांची कामे वाळूअभावी रखडली:लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी पैठणमध्ये ग्रामपंचायतींचे होतेय दुर्लक्ष‎

सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थींसाठी आवास योजना अमलात आणली आहे. या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी प्रती ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय शासनाने घेऊन पाच महिने झाले. मात्र, पैठणमध्ये आजपर्यंत केवळ ५२ लाभार्थींना मोफत वाळूचा लाभ मिळाला आहे. यात विविध घरकुल योजनेचे तालुक्यात १३ हजार ८१ घरकुल मंजूर असून ७ हजार घरकुलांची...