Monthly Archive: November, 2024

केंद्रीय दलाच्या आणखी 8 कंपन्या मणिपूरमध्ये पोहोचल्या:एक कंपनी महिला बटालियनची; मणिपूर काँग्रेसचे खरगे यांना पत्र- चिदंबरम यांच्यावर कारवाई करा

मणिपूरमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) आणखी 8 कंपन्या बुधवारी राजधानी इंफाळमध्ये पोहोचल्या. एक दिवस आधी CAPF च्या 11 कंपन्या मणिपूरला पोहोचल्या होत्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएपीएफ आणि बीएसएफच्या प्रत्येकी चार कंपन्या राज्याच्या संवेदनशील आणि सीमावर्ती भागात तैनात केल्या जातील. सीएपीएफची यापैकी एक कंपनी महिला बटालियनची आहे. केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केली होती की मणिपूरमध्ये 50 नवीन...

दिल्ली विधानसभा निवडणूक- आज येऊ शकते आपची पहिली यादी:पक्षाने PAC बैठक बोलावली, जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये होऊ शकतात निवडणुका

दिल्लीत 2025 च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. आम आदमी पार्टी (AAP) आज दिल्लीत राजकीय व्यवहार समितीची (PAC) बैठक घेणार आहे. यादरम्यान आप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. सध्याच्या सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्याच्या तारखेपूर्वी निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतो. गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2015 मध्ये झाल्या होत्या,...

राहुल म्हणाले- PM मोदी अदानींना वाचवत आहेत:सर्वसामान्य छोट्या गुन्ह्यातही तुरुंगात जातो, 2000 कोटींचा घोटाळा करूनही अदानी तुरुंगाबाहेर

अमेरिकेतील उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले- अदानीजी 2 हजार कोटींचा घोटाळा करत आहेत आणि बाहेर फिरत आहेत, कारण पंतप्रधान मोदी त्यांना संरक्षण देत आहेत. गौतम अदानी यांनी अमेरिकेत गुन्हे केले आहेत, मात्र भारतात त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही. अदानीच्या संरक्षक सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे....

मनसेच्या पराभवासाठी ठाकरे-शिंदे यांची छुपी युती होती का?:संदीप देशपांडे यांचा लाडक्या बहिणीचे भाऊ चीटर असल्याचा आरोप

मनसेच्या पराभवासाठी ठाकरे-शिंदे यांची छुपी युती होती का?:संदीप देशपांडे यांचा लाडक्या बहिणीचे भाऊ चीटर असल्याचा आरोप

राज्यातील लाडक्या बहिणींचा भाऊ हा चिटर असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेने एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचे पत्र व्हायरल झाले होते. यावर संदीप देशपांडे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. मनसेला हरवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांची छुपी युती होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात बोलताना संदीप...

सरकारी नोकरी:राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांसाठी भरती जारी केली आहे; वयोमर्यादा 56 वर्षे, पगार 2 लाखांपेक्षा जास्त

राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ने महिलांसाठी 30 पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ncw.nic.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: उमेदवारांकडे 10वी/ग्रॅज्युएट/मास्टर्स/लॉ बॅचलर डिग्री/डिप्लोमा असावा. वयोमर्यादा: कमाल 56 वर्षे पगार: महत्त्वाची कागदपत्रे: याप्रमाणे अर्ज करा: अर्ज पाठवण्याचा पत्ता: संयुक्त सचिव, राष्ट्रीय महिला आयोग (NCW) प्लॉट नं.-21, जसोला इन्स्टिट्यूशनल एरिया...

बहुमत असो किंवा नसो, अपक्षांना सोबत घेणार:भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; लाडक्या बहिणींच्या मतदानावर विश्वास

बहुमत असो किंवा नसो, अपक्षांना सोबत घेणार:भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; लाडक्या बहिणींच्या मतदानावर विश्वास

राज्यात मतांचा टक्का वाढला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान केले असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाचा आम्हाला फायदा आम्हाला होईल, असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले तरी किंवा नाही मिळाले तरी सत्ता स्थापन करताना अपक्षांना सोबत घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात महायुती पुन्हा सत्ता...

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार:काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा दावा; एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचेही केले स्पष्ट

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार:काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचा दावा; एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचेही केले स्पष्ट

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते तथा नागपूर उत्तर विधानसभा मतदाररसंघातील उमेदवार डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेची पहिली पसंती महाविकास आघाडी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. विविध संस्थांनी दाखवलेल्या एक्झिट पोलवरही त्यांनी साशंकाता व्यक्त केली आहे. एक्झिट पोलमधील अंदाज हा खरा नसतो, असेही त्यांनी म्हटले आहे. एक्झिट पोलबद्दल, नागपूर उत्तरमधील काँग्रेसचे उमेदवार...

राज्यातील राजकारणावर सट्टा बाजारातही वातावरण तापले:मोठ्या प्रमाणात उलाढाल; बहुमत कोणाला? कोणत्या पक्षाचे सरकार येणार?

राज्यातील राजकारणावर सट्टा बाजारातही वातावरण तापले:मोठ्या प्रमाणात उलाढाल; बहुमत कोणाला? कोणत्या पक्षाचे सरकार येणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र यातच विविध संस्थांच्या वतीने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात सरकार कोणाचे येणार? यावर अंदाज मांडण्यात येत आहे. याच अंदाजात सर्वात महत्त्वाचा असतो तो सट्टा बाजार. राज्यातील सट्टा बाजारात सुद्धा राज्याच्या निवडणुकीवरून चांगलेच वातावरण तापले आहे. 23 नोव्हेंबर रोजी कुणाला बहुमत मिळणार आणि कोणत्या पक्षाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार असले...

तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

तारापूर एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्याला आज भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या बाबत अद्याप अधिकची माहिती मिळू शकली नाही. मुंबईला लागून असलेल्या पालघरमधील तारापूर एमआयडीसीजवळील एका कारखान्यात पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू...

भाजपकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस बट्टा लावण्याचा प्रकार:तर निवडणूक आयोगही झोपाच काढत असावा; उद्धव ठाकरे गटाचा निशाणा

भाजपकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस बट्टा लावण्याचा प्रकार:तर निवडणूक आयोगही झोपाच काढत असावा; उद्धव ठाकरे गटाचा निशाणा

लोकशाही हाच देशाचा धर्म आहे. त्या धर्मासाठीच स्वातंत्र्याचा संग्राम झाला, पण निवडणुका म्हणजे धर्मयुद्ध असल्याचे सांगत भाजप व संघाचे लोक घराघरात पोहोचले. महाराष्ट्रासारख्या राज्यात हे घडत असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री त्यांच्या सरकारी लवाजम्यासह महाराष्ट्रात तळ ठोकून बसले. संपूर्ण सरकारी यंत्रणेचा गैरवापर त्यात होतो. नव्हे, तो कालच्या निवडणुकीत झालाच आहे. तरीही महाराष्ट्राने सावधपणे मतदान केले....