Monthly Archive: November, 2024

दिव्य मराठी अपडेट्स:पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे – पद्मश्री डॉ.‎ स्मिता कोल्हे यांना आज बोधनकर स्मृती पुरस्कार‎ प्रदान सोहळा

दिव्य मराठी अपडेट्स:पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे – पद्मश्री डॉ.‎ स्मिता कोल्हे यांना आज बोधनकर स्मृती पुरस्कार‎ प्रदान सोहळा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स खंडाळा घाटात बस अपघात रुग्णालयात असल्याने‎ भुमरे मतदानापासून वंचित‎ वडीगोद्री‎ – पैठण मतदारसंघात बुधवारी 351 मतदान केंद्रांवर 3‎वाजेपर्यंत 54.79 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख‎25 हजार 353 पैकी 1 लाख 78 हजार 253 मतदान‎झाले. मतांची वाढलेली टक्केवारी बघता कुणासाठी‎धोकादायक ठरणार याची चर्चा रंगली होती....

सहा हजार कोटी रुपयांचा बिटकाॅइन घोटाळा:गाैरव मेहताला सीबीआयकडून समन्स, अनेक राजकीय नेत्यांची नावे, ईडीने वाढवली तपासाची व्याप्ती

६ हजार कोटी रुपयांच्या गेन बिटकाॅइन चलन घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला ऑडिट कंपनीचा कर्मचारी गौरव मेहता याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. समन्स मिळताच शक्य तितक्या लवकर चौकशीसाठी हजर राहावे असे सीबीआयने मेहताला सूचित केले. २०१७ मध्ये दिवंगत अमित भारद्वाज व अजय भारद्वाज यांच्या व्हेरिएबल टेक प्रा.लि.ने ‘गेन...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आश्रयदेणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीची मोहीम सुरू:एनआयएसह इतर यंत्रणांनी सुरू केली संयुक्त कारवाई

जम्मू-काश्मीरमध्ये रहिवासी नसलेल्यांवर सातत्याने हल्ले करणारे दहशतवादी व त्यांच्या पाठराख्यांची आता खैर नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणारे, मदत करणाऱ्यांना कठाेर शिक्षेसाेबतच त्यांच्या मालमत्ताही गमवाव्या लागू शकतात. एनआयएने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी जम्मू-काश्मीर पाेलिस व इतर सुरक्षा दलाच्या सहकार्याने विशेष संयुक्त माेहीम सुरू केली आहे. त्यानुसार पाकिस्तानातून घुसखाेरी करून भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. त्याशिवाय राज्याचे रहिवासी नसलेल्या...

करहलमध्ये मतदानादरम्यान दलित मुलीची हत्या:वडील म्हणाले- सपाला मत न दिल्याने मारले; भाजप म्हणाला- लाल टोपीचे कुकृत्य

मतदाना दरम्यान मैनपुरीतील करहल येथे एका दलित मुलीची हत्या करण्यात आली. मृतदेह गोणीत भरून फेकून दिला होता. गावातील तरुणावर खुनाचा आरोप आहे. मतदानास नकार दिल्याने तरुणाने आपल्या मुलीची हत्या केल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. वडील म्हणाले- 3 दिवसांपूर्वी प्रशांत यादव (सपा समर्थक) जो पेपर वितरित करतो. तो स्वत:ला पत्रकारही म्हणवून घेतो. तो त्याच्या मित्रांसोबत माझ्या घरी आला. त्यांनी सपाला पाठिंबा देण्यास...

CBSE ने 10वी आणि 12वीची डेटशीट जारी केली:15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल दरम्यान होणार परीक्षा, 44 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बुधवारी रात्री उशिरा 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. 15 फेब्रुवारीपासून परीक्षा होणार आहेत. 10वीच्या परीक्षा 18 मार्चपर्यंत आणि 12वीच्या परीक्षा 4 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. पहिल्यांदाच परीक्षेच्या 86 दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे यावेळी शाळांनी एलओसी म्हणजेच लिस्ट ऑफ कँडिडेट वेळेवर भरली आहे. या सत्रात 44 लाख...

सुप्रीम कोर्टाने केरळ हायकोर्टाचा निर्णय रद्द केला:म्हटले- घटस्फोटाचा खटला प्रलंबित असेपर्यंत महिलेला वैवाहिक घराच्या सर्व सुविधा मिळण्याचा अधिकार

सुप्रीम कोर्टात मंगळवारी केरळमधील घटस्फोट प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठाने सांगितले – घटस्फोटाची याचिका प्रलंबित असतानाही, महिलेला लग्नानंतर मिळणाऱ्या सर्व सुविधांचा हक्क आहे. खंडपीठाने केरळ उच्च न्यायालयाचा 1 डिसेंबर 2022 चा निर्णय बाजूला ठेवला आणि कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय पुनर्स्थापित केला, ज्यामध्ये महिलेला तिच्या डॉक्टर पतीकडून दरमहा 1 लाख 75 हजार रुपये अंतरिम पोटगी...

हिंगोली जिल्हयात मतदानाचा टक्का वाढल्याने भावी आमदारांची धाकधूक वाढली:सर्वात जास्त कळमनुरीत 73 टक्के मतदान, हिंगोलीत 68 टक्के

हिंगोली जिल्हयात मतदानाचा टक्का वाढल्याने भावी आमदारांची धाकधूक वाढली:सर्वात जास्त कळमनुरीत 73 टक्के मतदान, हिंगोलीत 68 टक्के

हिंगोली जिल्हयात मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी वसमत विधानसभा मतदार संघ वगळता इतर दोन ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढल्याने भावी आमदारांचीही धाकधूक वाढली आहे. जिल्हयात तीन मतदार संघात सरासरी ७१.०५ टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त कळमनुरी तालुक्यात ७३ टक्के मतदान झाले आहे. हिंगोली जिल्हयातील हिंगोली, वसमत, कळमनुरी विधानसभा मतदार संघात ५३ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघात २३,...

मोनिका राजळे यांची शाळेच्या खोलीतून सुटका:राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी केल्याचा दावा

मोनिका राजळे यांची शाळेच्या खोलीतून सुटका:राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी केल्याचा दावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या आमदार व पाथर्डी उमेदवार मोनिका राजळे यांनी स्वतःला एका शाळेच्या खोलीत बंद करून घेतले होते. पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बूथ कॅप्चरिंगची माहिती मिळाल्यानंतर आपण शिरसाठवाडी या ठिकाणी गेलो असता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावाने हुल्लडबाजी सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. या हुल्लडबाजीमुळेच स्वतःला खोलीत बंद केले असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. शिरसाठवाडी येथे झालेल्या या घटनेमुळे...

विधानसभा निवडणुकीला गालबोट:साताऱ्याच्या भोसे गावात दोन गटात मारहाण

विधानसभा निवडणुकीला गालबोट:साताऱ्याच्या भोसे गावात दोन गटात मारहाण

सातारा जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडत असताना सातारा व कोरेगाव येथे शेवटच्या एका तासांमध्ये दोन विविध घटनांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या आहेत. सातार्‍यात किरकोळ कारणावरून राजे समर्थकांमध्ये मारामारी झाल्याने माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्यासह चौघेजण जखमी झाले. कोरेगाव मतदार संघात भोसे येथे बीप का वाजत नाही, अशी विचारणा करण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये मारामारी झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा...

भारताने महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिपची फायनल जिंकली:चीनचा 1-0 असा पराभव, दीपिकाचा गोल ठरला निर्णायक; तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

बिहारमधील राजगीर येथे झालेल्या महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीवर भारताने कब्जा केला आहे. टीम इंडियाने चीनचा 1-0 असा पराभव केला आहे. तिसऱ्या क्वार्टरच्या पहिल्या सामन्याच्या 31व्या मिनिटाला दीपिकाने टीम इंडियासाठी पहिला गोल केला, ज्यामुळे भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या आणि दुसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 30 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. भारत आणि चीनचे संघ 0-0 असे बरोबरीत...