जातीचे राजकारण – दलित समाज:दलित मतांचा 19 विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव; दलितांचे अंदाजे मतदान : 1.55 कोटी
दलितांना सामाजिक आरक्षणात १५ टक्क्यांचे प्रतिनिधित्व आहे. हेच सूत्र जर लोकसंख्येसाठी वापरले तर १३ कोटींच्या महाराष्ट्रात दलितांची लोकसंख्या १.९५ कोटी होईल. मात्र, हा मतदार राज्यभरात विखुरलेला आहे. तरीही त्याचा १९ विधानसभांमध्ये थेट प्रभाव आहे. म्हणून सत्ता मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे मराठा, ओबीसींना गोंजारले जाते त्याचप्रमाणे दलितांनाही विविध योजनांच्या माध्यमातून खुश ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतात. राज्यात २९ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी...