गोपीनाथगडावर मुंडे भाऊ-बहीण एकत्र:धनंजय मुंडेंनी बोलणे टाळले, पंकजाला म्हणाले सर्वांच्या वतीने तूच बोल; कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज 11वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने परळीतील गोपीनाथगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष दिवशी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला, पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तब्बल 11 वर्षांनी एकत्र गोपीनाथगडावर हजेरी लावली. राज्याच्या राजकारणात मोठे लक्ष वेधून घेतलेल्या या उपस्थितीमुळे गोपीनाथगडाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मंत्रीपद...