उद्या IPL चा अंतिम सामना, समारोप समारंभाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’:तिन्ही सेनाप्रमुख येणार की नाही हे संध्याकाळपर्यंत ठरेल, शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट
आयपीएलचा अंतिम सामना मंगळवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. अंतिम फेरीच्या समारोप समारंभाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ असेल. तिन्ही दलांचे प्रमुख या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. तथापि, त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप या समारंभातील सहभागाची पुष्टी झालेली नाही. संपूर्ण स्टेडियम तिरंगी रोषणाईने सजवले जाईल आणि या वेळी गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होईल. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले- ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा...