मी विनंती करतो की वाद चव्हाट्यावर येऊ नये:मुख्यमंत्री गुंता सोडवतील, पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे बोलताना कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. महायुतीमध्ये सर्व आलबेल राहील याची जबाबदारी भाजपची जास्त आहे. यासाठी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेत आहोत, की महायुतीत कुठे ठिणगी पडू नये. पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली असून तो गुंता ते सोडवतील, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, रायगडमधील तिन्ही...