Monthly Archive: June, 2025

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पुण्यात दोन शहराध्यक्ष:दोन नेत्यांकडे सोपवली जबाबदारी, दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर होते रिक्त

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पुण्यात दोन शहराध्यक्ष:दोन नेत्यांकडे सोपवली जबाबदारी, दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर होते रिक्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी 14 मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. समाजकंटकांकडून आपली राजकीय बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप करत, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून कटकारस्थाने केली जात असल्याचा दावा करत त्यांनी हा राजीनामा पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पुणे शहरासाठी...

मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापनेसाठी भाजपमध्ये एकमत:माजी CM बिरेन सिंह बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, 7 कुकी-जो आमदारही अनुपस्थित

वांशिक हिंसाचाराशी झुंजणाऱ्या मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापनेचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. ३० मे रोजी भाजपच्या २७ आमदारांची बैठक झाली. यामध्ये नवीन सरकार स्थापन करण्यावर एकमत झाले आहे. बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि माजी सभापती सत्यव्रत सिंह यांना दूर ठेवण्यात आले. या बैठकीला बिरेन सिंह यांच्याविरुद्ध बंड करणारे भाजप आमदार तसेच ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईपर्यंत त्यांना पाठिंबा देणारे...

संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस:ते जिथे जातात तिथे सगळे संपते, गुलाबराव पाटलांचा जोरदार टोला

संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस:ते जिथे जातात तिथे सगळे संपते, गुलाबराव पाटलांचा जोरदार टोला

संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे, ते जिथे जातील तिथे सगळे संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे पाच आमदार पाडण्याचे आव्हान देत संजय राऊत जळगावमध्ये आले होते. परंतु त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नव्हते, ते एकही आमदार पाडू शकले नाहीत,...

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा:मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, तेराही आखाड्याचे प्रमुख साधू उपस्थित; कधी असणार पहिले शाही स्नान?

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा:मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, तेराही आखाड्याचे प्रमुख साधू उपस्थित; कधी असणार पहिले शाही स्नान?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा...

SC म्हणाले- रागावणे हे आत्महत्येला प्रवृत्त करणे नाही:रागावल्याने असे घडू शकते याची कोणी कल्पनाही करू शकत नाही; आरोपी वॉर्डनची निर्दोष मुक्तता

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्याला रागावणे हे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे मानले जाऊ शकत नाही. यासह न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला. उच्च न्यायालयाने एका वसतिगृह वॉर्डनला आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोषी ठरवले होते. न्यायमूर्ती हसनैनुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘कोणी कल्पनाही करू शकत नाही की रागावल्यामुळे अशी घटना घडू...

भाजपने आता वन नेशन वन हसबंड सुरू केले आहे का?:हा कोणता जिहाद सुरू केलाय? सिंदूर वाटपावर संजय राऊतांचा जोरदार निशाणा

भाजपने आता वन नेशन वन हसबंड सुरू केले आहे का?:हा कोणता जिहाद सुरू केलाय? सिंदूर वाटपावर संजय राऊतांचा जोरदार निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आता वन नेशन वन हसबंड सुरू केले आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या ऑपरेशनची माहिती सर्वांना माहिती व्हावी म्हणून भाजपने घरोघरी सिंदूर वाटप सुरू केले आहे. यावरून संजय राऊत...

सर्व गोष्टी बोलून का दाखवतात? काही गोष्टी मनात ठेवा:अजित पवार यांचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला; दोन्ही NCP एकत्र येण्यावर बोलणे टाळले

सर्व गोष्टी बोलून का दाखवतात? काही गोष्टी मनात ठेवा:अजित पवार यांचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला; दोन्ही NCP एकत्र येण्यावर बोलणे टाळले

सर्व गोष्टी बोलून का दाखवतात? काही गोष्टी मनात ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिला आहे. राज्याचे कृषिमंत्री पद म्हणजे ओसाड गावाचा सरपंच अशा शब्दात कोकाटे यांनी कृषी मंत्री पदा बाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यावर अजित पवार यांनी आता माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला आहे. या संदर्भात...

बाबा आढाव यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांची सेवा केली:शंभरावा वाढदिवस पण उत्साहात साजरा करू, शरद पवारांकडून स्तुतीसुमने

बाबा आढाव यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांची सेवा केली:शंभरावा वाढदिवस पण उत्साहात साजरा करू, शरद पवारांकडून स्तुतीसुमने

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ अशी ओळख असलेले बाबा आढाव यांचा 95 वा वाढदिवस शरद पवारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. बाबा आढाव यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांची सेवा केली. त्यांचा 100 वा वाढदिवस पण मोठ्या उत्साहात साजरा करू, असे म्हणत शरद पवारांनी शुभेच्छा दिल्या. पुण्यातील मार्केट यार्डमधील हमाल पंचायतीच्या कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. बाबा आढाव यांच्याविषयी बोलताना शरद...

PSGने प्रथमच UEFA चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले:इंटर मिलानला 5-0ने हरवले; प्रशिक्षक लुईस एन्रिक यांनी विजय मुलीला समर्पित केला

शनिवारी म्युनिकमधील अलियान्झ अरेना येथे झालेल्या सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) ने इंटर मिलानचा पराभव करून यूईएफए चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले. या संघाने इंटर मिलानला ५-० ने हरवून इतिहास रचला, जो चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यातील सर्वात मोठा विजय आहे. पीएसजीने पहिल्यांदाच यूईएफए चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे. युवा खेळाडू डेजिरे ड्यूने दोन गोल केले (२०वे आणि ६३वे मिनिट). त्याला सामनावीराचा किताब...

IPL क्वालिफायर-2 मध्ये आज पंजाब-मुंबई सामना:सिद्धू म्हणाले- प्रत्येकाच्या ओठांवर हेच- पंजाब जिंकेल, श्रेयस अय्यर इतिहास रचेल

आयपीएल २०२५ क्वालिफायर २ मध्ये आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक रोमांचक सामना रंगणार आहे. सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवजोत सिंग सिद्धू यांनी पंजाब संघाचे कौतुक केले आहे. सिद्धू म्हणाले की, यावेळी संघ संपूर्ण पंजाबमध्ये विजय मिळवेल अशी आशा आहे आणि कर्णधार श्रेयस अय्यर इतिहास रचू शकतो. पंजाब किंग्जला पहिल्यांदाच आयपीएल प्लेऑफमध्ये घेऊन जाणाऱ्या श्रेयस अय्यरने यापूर्वी...