श्रीनगरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक:3 दहशतवादी लपल्याची बातमी; काल सोपोरमध्येही एक दहशतवादी मारला गेला

श्रीनगरच्या जबरवान भागात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. लष्कराला 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. दाचीगाम आणि निशातच्या वरच्या भागाला जोडणाऱ्या जंगलात सकाळी नऊच्या सुमारास ही चकमक सुरू झाली. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि पोलिसांनी या भागात संयुक्त शोध मोहीम राबवली. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सध्या चकमक सुरू आहे. गेल्या १५ तासांत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही दुसरी चकमक आहे. तर नोव्हेंबर महिन्यातील 10 दिवसांतील ही 7वी चकमक आहे. आतापर्यंत एकूण 8 दहशतवादी मारले गेले आहेत. याआधी 9 नोव्हेंबरच्या संध्याकाळी बारामुल्लाच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. ८ नोव्हेंबरलाही सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. रामपूरच्या जंगलातही चकमक सुरू आहे. गेल्या 9 दिवसांत खोऱ्यात झालेल्या दहशतवादी घटना आणि चकमकी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment