आता डेटिंग ॲपच्या माध्यमातून सायबर भामट्यांचा गंडा:पुण्यातील तरुणाची 33 लाख 78 हजारांची ऑनलाइन फसवणूक

आता डेटिंग ॲपच्या माध्यमातून सायबर भामट्यांचा गंडा:पुण्यातील तरुणाची 33 लाख 78 हजारांची ऑनलाइन फसवणूक

सायबर गुन्हेगारी माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांना दररेज काेट्यावधी रुपयांचा गंडा ऑनलाइन घातला जात आहे. मात्र, सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यास पाेलिस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवत असताना आता डेटिंग अॅपच्या माध्यमातून पुण्यातील एका तरुणास ३३ लाख ७८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाघाेली पाेलिस ठाण्यात आर्थिक फसवणुक व आयटी ॲक्टनुसार अज्ञात आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जस्टीन काेचुकुटील जाॅन (वय-३७,रा.वाघाेली,पुणे) यांनी याबाबत पाेलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर अज्ञात टेलिग्राम आयडी धारक, वेबलिंक धारक व विविध बँक खातेधारक यांचेवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांचे मित्राने सांगण्यानुसार त्यांनी फाॅरेक्स ट्रेडिंग संदर्भाकरिा डेटिंग अॅप मधून संर्पक झालेल्या नमिता नावाच्या तरुणीशी सुरुवातीला बाेलणे केले. तिने तक्रारदा यांना कस्टमर केअरशी गुंतवणुकी बाबत संर्पक करण्यास सांगून तने सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी टेलिग्राम युजरला संर्पक केला, त्यावेळी त्याने एक वेबलिंग देऊन त्याद्वारे फाॅरेक्स ट्रेडिंग बाबतचे अॅडमीरल मार्केटस या पाेर्टलवर तक्रारदार याचे नाव, ईमेल, आधार, पॅनकार्ड आदी व्यैक्तिक माहिती अपलाेड करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी आराेपींनी दिलेल्य लिंकवर क्लिक केली त्यानुसार तक्रारदार यांना फाॅरेक्स ट्रेडिंग करन्सी मध्ये गुंतवणुकीवर सुरुवातीस काही रक्कम गुंतवणुक करण्यास सांगून त्याचा थाेडाफार परतावा दिल्याचे भासवले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करुन माेठ्या प्रमाणात गुंतवणुक करण्यास सांगून विविध बँक खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यास सांगत त्यांची एकूण ३३ लाख ७८ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आलेली आहे. याबाबत वाघाेली पाेलिस स्टेशनचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक पंडित रेजितवाड पुढील तपास करत आहे. शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ४९ लाखांची फसवणूक स्टाॅक व शेअर ट्रेडिंग मार्फत नफा मिळवून देताे असे सांगून पुण्यातील फुरसुंगी परिसरातील एका व्यवसायिकास जेसिका व कपिल नावाच्या अज्ञात व्यक्तींनी संर्पक केला. त्यांना अल्पावधीत चांगल्याप्रकारे फायदा हाेईल असे सांगत एकूण ४९ लाख ५५ हजार रुपये गुंतवणुक करण्यास भाग पाडून सदर रकमेचा काेणताही परतावा न देता संबंधित रकमेची आर्थिक फसवणुक करण्यात आलेली आहे.याप्रकरणी अरुणकुमार आनंदराव माेगंटी (वय-४४,रा.फुरसुंगी,पुणे) यांनी फुरसुंगी पाेलिस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार २१/१२/२०२३ ते ५/२/२०२४ यादरम्यान घडला आहे. तक्रारदार यांना सुरुवातीला माेबाईलवर जेसिका नावाच्या महिलेने संर्पक साधून त्यांना शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना ब्लॅक राॅक कॅपिटील व्हीआयपी ६१ या व्हाॅट्सअप ग्रुप मध्ये सहभागी करुन इतरांना कशाप्रकारे अल्पावधीत फायदा मिळत आहे हे भासवून गुंतवणुक करण्यास भाग पाडले. माेगंटी यांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना थाेडा परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन करत, माेठी गुंतवणुक केल्यास माेठा परतावा मिळेल असे सांगत त्यांना विविध बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ४९ लाख ५५ हजार रुपये गुंतवणुक केल्यावर त्यांना काेणती रक्कम परत न करता त्यांची सदर रकमेची फसवणुक करण्यात आली आहे. टास्कच्या बहाण्याने गंडा काेथरुड परिसरात रहाणाऱ्या निलम महेश गावडे (वय-४२) यांच्याशी सायबर चाेरट्यांनी संर्पक करुन त्यांना शेअर ट्रेडिंग ॲप मध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवले. त्यांना एका लिंकवर जाऊन त्यात अकाऊंट तयार करायला लावून टास्क करण्याच्या माध्यामतून किरकाेळ रक्कम त्यांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आणखी चार लाख ३२ हजार रुपयांची गुंतवणुक घेऊन त्यापैकी पाच हजार रुपये त्यांना माेबदला पुन्हा पाठवून ऊर्वरित चार लाख २७ हजार रुपयांचा काेणता माेबदला न देता किंवा परतावा न देता मुळ रक्कमही परत करण्यास न येता फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत काेथरुड पाेलिस पुढील तपास करत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment