गरब्यात थिरकणारी पावले रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा…:गोरेगावातील नेस्को मैदानावरील व्हिडिओ व्हायरल

गरब्यात थिरकणारी पावले रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा…:गोरेगावातील नेस्को मैदानावरील व्हिडिओ व्हायरल

भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रतन टाटा यांनी आपली प्रकृती ठीक असून रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेलो होतो, असे दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सांगितले होते. रतन टाटा यांच्या निधनाची वार्ता मिळताच मुंबईतील नेस्को मैदानावर सुरू असलेला गरबा थांबवत टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या नवरात्र सुरू असल्याने ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन केले जात आहे. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानावरील आयोजित गरबा मुंबईकरांसाठी आकर्षण असते. याठिकाणी अनेकजण गरबा खेळण्यासाठी दाखल होत असतात. नेस्को मैदानावरील गरब्यात गाणी आणि नाच सुरू असतो. परंतु, बुधवारी रात्री उशिरा गरब्यावर थिरकणारी ही पावले काही वेळासाठी थांबली होती. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर नेस्को मैदानावर शांतता पसरली होती. यावेळी मैनू विदा करो… हे गाण्याद्वारे रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केवळ लेजंड रतन टाटा यांच्यासाठी गरबा देखील थांबला, असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. राज्यात एक दिवसाचा दुखवटा नरिमन पॉइंट येथील एनसीपीए येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वरळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये झाला रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. 1962 मध्ये टाटा समूहात येण्यापूर्वी रतन टाटा यांनी काही काळ अमेरिकेत काम केले होते. 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवण्यात आले. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले.

​भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रतन टाटा यांनी आपली प्रकृती ठीक असून रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेलो होतो, असे दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सांगितले होते. रतन टाटा यांच्या निधनाची वार्ता मिळताच मुंबईतील नेस्को मैदानावर सुरू असलेला गरबा थांबवत टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या नवरात्र सुरू असल्याने ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन केले जात आहे. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानावरील आयोजित गरबा मुंबईकरांसाठी आकर्षण असते. याठिकाणी अनेकजण गरबा खेळण्यासाठी दाखल होत असतात. नेस्को मैदानावरील गरब्यात गाणी आणि नाच सुरू असतो. परंतु, बुधवारी रात्री उशिरा गरब्यावर थिरकणारी ही पावले काही वेळासाठी थांबली होती. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर नेस्को मैदानावर शांतता पसरली होती. यावेळी मैनू विदा करो… हे गाण्याद्वारे रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केवळ लेजंड रतन टाटा यांच्यासाठी गरबा देखील थांबला, असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. राज्यात एक दिवसाचा दुखवटा नरिमन पॉइंट येथील एनसीपीए येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वरळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये झाला रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. 1962 मध्ये टाटा समूहात येण्यापूर्वी रतन टाटा यांनी काही काळ अमेरिकेत काम केले होते. 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनवण्यात आले. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment