आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेल्या महेश गायकवाडांची सेनेतून हकालपट्टी:महायुतीमधील वादाची पुन्हा चर्चा

आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केलेल्या महेश गायकवाडांची सेनेतून हकालपट्टी:महायुतीमधील वादाची पुन्हा चर्चा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील शिवसेना नेते महेश गायकवाड आणि महायुतीच्या इतर नऊ सदस्यांना निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये महेश गायकवाड हे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जुन्या वादातून उल्हासनगर शहरातील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गोळीबार केला होता. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गायकवाड यांच्यासह युतीचे सदस्य पक्षविरोधी कारवायांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत पक्षाच्या सूचनांचे पालन करत नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम सत्ताधारी महायुतीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे महेश गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अशा स्थितीत यावेळी निवडणूक निकालात अनपेक्षित ट्विस्ट येऊ शकतो. भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत या मतदारसंघात लढत आहे. त्यात गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने कडवी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम भाजपच्या उमेदवारावर होऊ शकतो. तर उमेदवारी अर्ज भरला नसता नामांकनानंतर गायकवाड यांनी भाजपवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “योग्य उमेदवाराला तिकीट दिले असते तर बंडखोरी करून निवडणूक लढवण्यात आपल्याला रस नव्हाता. मात्र एका भ्रष्ट नेत्याला तिकीट देण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात गोळीबार करण्याचे धाडस करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला तिकीट कसे देता येईल? त्या व्यक्तीच्या जागी दुसरे कोणी असते तर आम्हाला हे पाऊल उचण्याची आवश्यकता पडली नसती, असे देखील त्यांनी म्हटले आहे. आमदार गणपत गायकवाडांचे गोळीबार प्रकरण काय? शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात काही गुंठे जमिनीवरुन वाद सुरू होता. हे प्रकरण 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोघे पोलिस ठाण्यात आले होते. गणपत गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. दोघांमध्ये द्वारली गावातील जमिनीवरुन वाद महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये राजकीय शीतयुद्ध सुरु होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावातील जमिनीवरुन वाद निर्माण झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेले.याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये हल्ला केला होता. यादरम्यान पाच ते सहा गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. महेश गायकवाड कोण आहेत? महेश गायकवाड हे शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख आहेत. कल्याणमधील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. तरुणांमध्ये ते लोकप्रीय आहेत. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये शहरात राजकीय वाद आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्यामध्ये या आधीही वाद झाले आहेत. माही महिन्यांपूर्वी महेश गायकवाड यांच्या लावण्यात आलेल्या एका बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला होता. भाजपने गणपत गायकवाड यांचे तिकीट कापले पण पत्नीला उमेदवारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात जाऊन शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. सुदैवाने महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील या गोळीबारात बचावले होते. मात्र, या घटनेची चर्चा देशभरात झाली होती. तसेच तेव्हापासून गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत. याचाच परिणाम म्हणून गणपत गायकवाड यांचे तिकीट भाजपने कापले. तरी देखील त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपने तिकीट जाहीर केले आहे. सुलभा गायकवाड या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गणपत गायकवाड तुरुंगात गेल्यानंतर सुलभा गायकवाड यांनी राजकारणात देखील सक्रिय सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment