जरांगे, संभाजी भोसलेंच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला:लक्ष्मण हाके यांचा आरोप, कंधार पोलिस ठाण्यावर काढला मोर्चा
लोह मतदारसंघातील बाचोटी येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला झाला होता. 100 ते 150 तरुणांचा जमावाने त्यांच्या कारला घेरले होते. काहींनी गाडीच्या मागच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्याच्या निषेधार्थ कंदार पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. माझ्यावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता. मनोज जरांगे, संभाजी भोसले आणि शरद पवार यांच्या कार्यर्त्यांनी हा हल्ला केला, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी यावेळी केला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, कालचा हल्ला पूर्वनियोजित होता. पुण्यातील हल्ला शरद पवार, मिस्टर संभाजी भोसले आणि मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. विचारांची लढाई विचाराने लढा. पण तुम्ही दहशतवाद निर्माण करत आहात. आमच्या बापजाद्यांनी तुमचे झेंडे उचलले असतील. पण आता आमची लेकरं तुमचे झेंडे उचलणार नाहीत. तुम्ही आमच्यामुळे आमदार-खासदार झाला, मंत्री झालात. आणि आता आमच्याच उरावर तुम्ही नाचता. आम्हाला प्रचार करू देत नाहीत. महाराष्ट्र का कुणाच्या बापाची जहागीर, कुणाची मक्तेदारी नाहीये, असे लक्ष्मण हाके म्हणाले. नेमके काय घडले?
हल्ल्याबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, हल्ला करणारे हातात काळे झेंडे घेऊन आले होते. 100 ते 150 तरुणांचा जमाव होता. सुरुवातीला काही जण गाडीच्या बोनेटवर चढले. तर काहींनी गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडल्या. यावेळी हल्लेखोरांनी एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगेंच्या नावाची घोषणाबाजी केली. हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावरच मांडले ठाण
दरम्यान, या हल्ल्यानंतर ओबीसी आंदोलक आक्रमक झाले. आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडून घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ लक्ष्मण हाके यांनी आज कंधार पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या मोर्चात ओबीसी समाजातील लोक उपस्थित होते. हे ही वाचा… पंडित नेहरू ते राहुल गांधी सारेच आरक्षणविरोधी:नरेंद्र मोदी यांचा आरोप; म्हणाले – काँग्रेसचा जातींमध्ये भांडणे लावण्याचा डाव काँग्रेसचा जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचा डाव आहे. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंपासून ते त्याच परिवारातील युवराज (राहुल गांधी) पर्यंत नेहरू-गांधी परिवार आरक्षण विरोधी आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते धुळ्यामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. पूर्ण बातमी वाचा… फडणवीसांच्या मतदारसंघातून 1300 महिला गायब- पटोले:नांदेड जिल्ह्यात मुदखेड येथे झालेल्या जाहीर सभेत केली टीका राज्य सरकारने 6 हजार कोटी रुपयेजाहिरातींवर खर्च केला. 67 हजार महिला महाराष्ट्रातून गायब झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या मतदारसंघातूनही 1300 महिला गायब झाल्या आहेत. महिलांविषयी सरकारला काहीही देणे घेणे नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पूर्ण बातमी वाचा…