बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश:अनेक सक्षम उमेदवार असल्याने आमच्याकडे बंडखोरी वाढली – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश:अनेक सक्षम उमेदवार असल्याने आमच्याकडे बंडखोरी वाढली – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

धर्म -जातीत भांडण लावून राज्य करणे, हे भाजपचे धोरण राहिले आहे काँग्रेस हे सर्व समाजाला सोबत घेऊन समान न्याय देण्याचा प्रयत्न करते. जातनिहाय जनगणना आम्ही करणार आहे. आघाडीचे सरकार बनणार असल्याने मोठ्या प्रमाणात निवडणुकीत आमच्याकडे इच्छुक आहे. ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. त्यासोबत पक्षाकडून आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले, पण त्यात यश आम्हाला आले नाही. अनेक सक्षम उमेदवार आमच्याकडे असल्याने बंडखोरी वाढली. मुख्यमंत्री कोण बनणार हा दुय्यम प्रकार आहे. निवडणुकीच्यानंतर आम्ही आघाडीमध्ये एकत्रित याबाबत निर्णय घेऊ. राज्यात आघाडीच्या 180 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचे आमचे ध्येय आहे, असे मत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, रोहन सुरवसे उपस्थित होते. थोरात म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही सक्षमपणे सामोरे जात आहे. निवडणूक प्रचारावेळी आम्ही जाहीरनाम्यात जनतेला महत्वपूर्ण आश्वासने दिली आहे. आमच्या आश्वासने जाहीरातींवर महायुती जाहिरात देऊन फसव्या योजना असल्याचे सांगत जनतेची दिशाभूल करत आहे. महायुती सरकारबद्दल प्रचंड चीड आहे, कारण असंवैधानिक पद्धतीने सरकार सत्तेत आले. ज्या नेत्यावर 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यांनाच सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यांच्यावरील चौकशी थांबवली जाते. हे जनतेला पटलेले नाही. पक्षांतर बंदी कायद्याचा गैरवापर करण्यात आला आहे. शेतकरी, महिला आणि युवक यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. पुण्यात शिक्षणाचे माहेरघर असताना, ड्रग्स केंद्र बनले आहे. शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने जनतेत असंतोष आहे. त्यामुळे जनतेत नाराजी आहे. राज्यात आघाडीला चांगले यश निवडणुकीत मिळेल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. राज्यात आर्थिक स्थिती बिघडलेली मागील अडीच वर्षात राज्यातील आर्थिक स्थिती बिघडली आहे. सदस्यांना निधी कमी पडला याबाबत प्रथमच अभिभाषण झाले. बेशिस्त निधी वाटप करून काही जणांना मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे. गरिबांना मदत करणाऱ्या योजना आम्ही सातत्याने मांडत आलो पण त्याकडे सरकार लक्ष्य देत नाही. अर्थ खात्याचा बोजवारा उडला आहे. लाडक्या निधीला किती खर्च दिला यापेक्षा शासन आपल्या दारी यासाठी किती निधी दिला हे तपासले पाहिजे असे मत थोरात यांनी व्यक्त केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment