आमने-सामने:उद्धव 370 च्या विरोधकांसोबत -शाह ; 370 ला आमचाच पाठिंबा होता- उद्धव

आमने-सामने:उद्धव 370 च्या विरोधकांसोबत -शाह ; 370 ला आमचाच पाठिंबा होता- उद्धव

जम्मू-काश्मिरातील कलम 370च्या विरोधकांसोबत उद्धव ठाकरे गेले आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली, तर 370 रद्द करण्यास 2019 मध्ये आमच्याच पक्षाने तुम्हाला ठामपणे जाहीर पाठिंबा होता हे विसरलात का, असे उद्धव ठाकरे यांनी शाह यांना विचारले आहे. सवाल- सावरकरांविषयी राहुल गांधींना दोन चांगले शब्द बोलायला लावू शकता? उत्तर – काश्मिरात पंडितांवर अत्याचार होत असताना हे मोदी-शाह कुठे होते?
शिवसेनाप्रमुखांविषयीही शाहांचे आव्हान हे राहुलबाबा आमच्या सावरकरांना विरोध करत आहेत. उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत दोन चांगले शब्द बोलायला सांगा. शेतमालाऐवजी राम मंदिराचा विषय काढता? – ठाकरे महाराष्ट्रातील शेतकरी शेतमालाला भाव मागतात तर तुम्ही राम मंदिर बांधल्याचा विषय काढता? राम मंदिर बांधताना आम्ही तुमच्यासोबत नव्हतो का? मी मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यानंतरही काँग्रेसच्या आमदारांना घेऊन अयोध्येत गेलो होतो.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment