संजय राऊत यांचा अमित शहांवर निशाणा:सावरकरांना भारतरत्न का देत नाही? बाळासाहेबांवरील प्रेम हे खोटे असल्याचा आरोप

संजय राऊत यांचा अमित शहांवर निशाणा:सावरकरांना भारतरत्न का देत नाही? बाळासाहेबांवरील प्रेम हे खोटे असल्याचा आरोप

आपला माल विकण्यासाठी व्यापारी नेहमी खोटे बोलत असतो. तसेच खोटे बोलण्याचे काम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करत असतात. ते व्यापारी आहेत. त्यामुळे ते खोटे बोलत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. सावरकांना भारतरत्न देणे हे अमित शहांच्या हातात आहे. मात्र, ही मागणी ते का पूर्ण करत नाहीत, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागायला लावण्याचे आव्हान अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते. ठकारेंनी माफी मागून दाखवावी, असे म्हणत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम 370 प्रकरणांमध्ये अमित शहा हे खोटे बोलत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आमच्या शिवसेनेने 370 कलम हटवण्याला पाठिंबा दिला होता, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने त्यांच्या बॅनर वरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवावा. त्यांना राज्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक पावलावर बाळासाहेब ठाकरे यांची गरज पडत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम असते तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला नसता, तो पक्ष चोरी केला नसता, त्याच्यावर डाका टाकला नसता, असे म्हणत संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर प्रति हल्ला चढवला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना विकली, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याची आवश्यकता नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. भाजप आणि शिवसेना पेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगले आहेत. त्यांच्या मनात बाळासाहेबांविषयी खोटे प्रेम नाही. ते मनापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपचे बाळासाहेबांवरील प्रेम हे खोटे असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment