मुंबईसह 40 ते 42 मतदारसंघात अमराठी मतांचा बोलबाला:उत्तर प्रदेश, बिहारमधील मतदारांच्या आधारावर चालते मनसे, शिवसेनेचे राजकारण

मुंबईसह 40 ते 42 मतदारसंघात अमराठी मतांचा बोलबाला:उत्तर प्रदेश, बिहारमधील मतदारांच्या आधारावर चालते मनसे, शिवसेनेचे राजकारण

‘मुंबई मराठी माणसाची’ या मुद्द्यावर शिवसेना, मनसेचे राजकारण सुरू आहे. दुसरीकडे मंुबईत मराठी माणसाचा टक्का घसरून अमराठी वाढत आहेत. राज्यात अमराठी समाजाची निश्चित टक्केवारी उपलब्ध नसली तरी वििवध अभ्यासानुसार ती १३ ते १५ टक्के आहे. ४० ते ४२ मतदारसंघात या मतांचा बोलबाला आहे. २०११ च्या जनगणनेत भाषेच्या तक्यावरून अमराठी भाषिकांची माहिती मिळते. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरात उत्तर (उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान), दक्षिण भारतीय (तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश), गुजराती, सिंधी आणि ईशान्येकडील नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रातून मुंबई शहरात होणारे स्थलांतरही घटले डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड अर्बन स्टडीज ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सचे राम बी. भगत यांच्या अभ्यासानुसार १९६१ मध्ये मुुंबईत महाराष्ट्रातून स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण ४१.०६% होते. २०११ मध्ये ते ३७.४%झाले. तर यूपी, बिहारमधून येणाऱ्यांचे प्रमाण १२ वरून २४%, ०.२% हून ३.५ टक्क्यांवर गेले. मुंबईत दहा वर्षांत २.६४ टक्के घटला मराठी माणूस २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईत २००१ ते २०११ दरम्यान मराठी मातृभाषा असणारे लोक ४५.२३ लाखांवरून २०११ मध्ये ४४.०४ लाख (२.६४% घट) झाले. याच काळात हिंदी भाषिकांची संख्या २५.८२ लाखांवरून ३५.९८ लाख (३९.३५% वाढ) झाली. गुजराती १४.२८ लाखांवरून १४.३४ लाखांवर पोहोचले. अमराठी लोकसंख्या : काही प्रमुख शहरांमधील टक्केवारी अशी 1. मुंबई एमएमआर : 55-60% उत्तर भारतीय बंगाली गुजराती सिंधी दक्षिण भारतीय भायखळा कुलाबा सायन-कोळीवाडा अंधेरी पूर्व धारावी मुलुंड भांडूप घाटकोपर माणखुर्द
2. ठाणे : 40-45% : ठाणे कल्याण उल्हासनगर भिवंडी पूर्व
3. नवी मुंबई : 40-45 टक्के गुजराती उत्तर भारतीय सिंधी दक्षिण भारतीय
-बेलापूर, ऐरोली, पनवेल
4. पुणे : 25-30% शैक्षणिक आणि IT हब असल्याने उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पिंपरी-चिंचवड, हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर
5. नाशिक : 20-25% : गुजराती, उत्तर भारतीय आणि मारवाडी समाज नाशिक पूर्व, नाशिक मध्य, देवळाली
6. नागपूर : 15-20% : उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय नागपूर दक्षिण, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम
7. छत्रपती संभाजीनगर : 10-15% : उत्तर भारतीय, गुजराती, सिंधी, मारवाडी छत्रपती संभाजीनगर मध्य व पूर्व 8. जळगाव, सोलापूर आणि कोल्हापूरातही अमराठी लोकसंख्या वाढली आहे. १९५१ ते २०२४ दरम्यान मुंबईतून निवडून आलेल्या १०० पैकी ४३ खासदार अमराठी. यात काँग्रेसचे २६, भाजपचे ९ तर उर्वरित अन्य पक्षांचे आहेत. विधानसभेला महायुतीने मुंबईत ३६ पैकी १३, मविआने १२ जागांवर अमराठी उमेदवार दिले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment