भाजपला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली:नाना पटोले यांची जीभ घसरली, फडणवीसांवरही साधला निशाणा

भाजपला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली:नाना पटोले यांची जीभ घसरली, फडणवीसांवरही साधला निशाणा

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची भाजपवर टीका करताना जीभ घसरल्याचे पहायला मिळाले. अकोला येथील आयोजित सभेत बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. ते इतके मस्ती आलेत की, स्वत:ला देव समजत आहेत, असे नाना पटोले म्हणाले. या वक्तव्यामुळे नाना पटोले यांच्यावर भाजपकडून टीका होत आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार साजिद खान मन्नत खान यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री नाना पटोले यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना नाना पटोले म्हणाले, येथे ओबीसी समुदायातील लोक सुद्धा उपस्थित आहेत. अकोला जिल्ह्यातील ओबीसी लोक भाजपला मतदान करतील का? जे तुम्हाला कुत्रा बोलतात. त्यामुळे आता भाजपला कुत्रा बनवण्याची वेळी आली आहे. यांना इतकी मस्ती आली की, हे आता स्वत:ला देव समजत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. एक विश्वगुरू दिल्लीत, दुसरे महाराष्ट्रात तयार होताहेत
नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मला सगळे लोक पहिल्यापासून नाना भाऊ म्हणतात. मला घरात तसेच तुम्ही सगळे नाना भाऊ म्हणतात. फडणवीसांना सगळे देवेंद्र फडणवीस म्हणायचे. पण, आता त्यांनी आपले नाव बदलून देवाभाऊ केले आहे. काही दिवसांनंतर ते त्यांच्या नावापुढील भाऊ हा शब्द देखील काढतील. त्यानंतर काय राहील? यावर सर्वांनी देवा असे उत्तर दिले. यावर नाना पटोले म्हणाले, एक विश्वगुरू दिल्लीत बसलेत. दुसरे महाराष्ट्रात तयार होत आहेत. यांना सत्तेची इतकी मस्ती आली की, ते स्वत:ला देव समजत आहेत. त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. … तर नववधू नक्षलवादी आहे हा?
भाजप राहुल गांधी यांच्याबाबत खोटारडेपणा पसरवत आहे. भाजपची विचारसरणी मनुस्मृतीतून निर्माण झाली आहे आणि काही निवडक लोकांनी राज्य करत राहण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचेही नाना पटोले म्हणाले. लाल रंग हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. पण, या लाल रंगाचा संबंध फडणवीस-भाजप नक्षलवादाशी जोडतात. एक नववधू लाल साडी नेसते, तिचे कुंकू लाल असते. याचा अर्थ ती नक्षलवादी आहे का? कोणीतरी देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगा, अशी टीकाही पटोले यांनी केली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment