राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द:विमानात झाला तांत्रिक बिघाड; राहुल गांधी यांनी व्हिडिओद्वारे मागितली शेतकऱ्यांची माफी

राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द:विमानात झाला तांत्रिक बिघाड; राहुल गांधी यांनी व्हिडिओद्वारे मागितली शेतकऱ्यांची माफी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द करण्यात आली आहे. त्या नंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक व्हिडिओ संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला आज चिखलीला यायचे होते. तेथे मला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचे होते आणि एका जाहीर सभेला संबोधित करायचे होते. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मी येऊ शकलो नाही. मला माहित आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देत नाही. पण मी तुम्हाला आश्वासित करतो की, आमचे सरकार आल्यानंतर सरकार तुमची काळजी घेईल आणि तुमच्या समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेल.’ राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ जारी करून ही माहिती दिली आणि सांगितले की, मला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती समजते आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत आणि त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली. वायनाडमध्येही केला प्रचार यापूर्वी राहुल गांधी त्यांची बहीण प्रियांका गांधी यांच्यासाठी वायनाडला गेले होते. प्रियंका गांधी या वायनाडमधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही जिंकली होती. यानंतर वायनाडची जागा रिक्त झाली. येथील सभेत राहुल गांधी यांनी पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. ज्याच्या पाठीवर “आय लव्ह वायनाड” असे लिहिलेले होते. तर प्रियांका गांधी यांनी निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या वेळी राहुल गांधी म्हणाले की, “मी प्रियंका गांधींना वायनाडला जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ बनवण्याचे आव्हान देऊ इच्छितो. हे साध्य करण्यासाठी मी मदत करेलच आणि त्याचा फायदा वायनाडच्या लोकांच्या आर्थिक विकासाला होईल.”

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment