बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू:शेतात कापूस वेचणी करत असताना अचानक झाला हल्ला

बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू:शेतात कापूस वेचणी करत असताना अचानक झाला हल्ला

बिडकीन पोलीस ठाणे हद्दीतील 74 जळगाव येथे शेतामध्ये कापूस वेचणी करत असताना प्रणाली मुळे या 10 वर्षीय इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याने प्रणालीचा मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की गट नंबर 199 मधील राधाकिसन मुळे यांच्या शेतामध्ये मनीषा भरत मुळे ही महिला गेली होती तिच्यासोबत तिची मुलगी प्रणाली भरत मुळे (वय १0) ही पण होती. कापूस वेचणी करत असताना प्रणालीवर बिबट्याने साडेचार वाजता हल्ला करून तिला तुरीच्या पिकामध्ये ओढत नेत असताना सोबत कापूस वेचणी करत असलेल्या सहा ते सात महिलांनी ओरडा केल्याने बिबट्याने प्रणालीला जागेवरच सोडले. मात्र त्याने तिची मान धरल्याने प्रणाली मरण पावली नंतर त्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या फरार झाला. दरम्यान या घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली आहे तर बिडकीनचे सहाय्यक फौजदार तांगडे यांनी त्वरित घटनास्थळ गाठून प्रणालीस ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी ग्रामीण रुग्णालयात प्रणालीच्या नातेवाईकाशी भेट घेऊन माहिती घेतली. ग्रामीण रुग्णालय येथे प्रणालीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला असून उद्या सकाळी तपासणी करण्यात येणार आहे. गेली तीन ते चार महिने पासून 74 जळगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे येथील ग्रामस्थ व सरपंच गौतम सोनवणे यांनी वनविभागास कळवले होते मात्र वन विभागाने याची गंभीर दखल न घेता एक पिंजरा रोडच्या बाजूला आणून ठेवला त्यानंतर ती तिकडे पंधरा दिवस फिरकले ही नाही पिंजरा लावून वनविभागाने ग्रामस्थांची फक्त समज काढली त्यांच्या तक्रारीची गंभीर न घेतल्याने आजची वेळ आली असा आरोप सरपंच सोनवणे यांनी केला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment