कसबा मतदारसंघात अपघाती आमदार आला:त्याने काम कमी आणि दंगे जास्त असा प्रकार केला, देवेंद्र फडणवीस यांची धंगेकरांवर टीका

कसबा मतदारसंघात अपघाती आमदार आला:त्याने काम कमी आणि दंगे जास्त असा प्रकार केला, देवेंद्र फडणवीस यांची धंगेकरांवर टीका

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत एक अपघाती आमदार आल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधताना केली. यावेळी त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या कामाची प्रशंसाही केली. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यमान काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, कसबा मतदारसंघात महायुती उमेदवार हेमंत रासने यांचे कौतुक केले पाहिजे. कारण त्यांनी जनतेचे समस्या सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा केला. देशात एक ‘ अपघाती मुख्यमंत्री ‘ चित्रपट तयार झाला होता की, तशाप्रकारे याठिकाणी विरोधी पक्षाचा एक अपघाती आमदार पोटनिवडणूक मध्ये विजयी झाला. पण त्याने काम कमी आणि दंगे जास्त असा प्रकार केला आहे. मात्र, रासने यांनी पराभव झाल्यावर घरी नैराश्याने न बसता दुसऱ्या दिवसापासून जनतेत जाऊन काम सुरू केले. काँग्रेसने लोकसभा निवडणूक प्रमाणे उलेमा यांचे पाय चाटण्याचे काम सुरू केले. त्यांनी १७ अटी टाकल्या असून अल्पसंख्याक समुदायाचे लांगूलचालन करण्याचे काम आघाडी करत आहे. व्होट जिहाद प्रयत्न पुन्हा सुरू करण्यात आले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी मागणी ते करत असून त्यांचा बाप देखील संघावर बंदी घालू शकत नाही. व्होट जिहाद ते करत असतील तर आपल्याला मताचे जिहाद सुरू कऱ्याचे आहे कारण पुढील पिढीच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, हेमंत रासने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर, जगदीश मुळीक, संजय सोनवणे, स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट, संदीप खर्डेकर, अजय खेडेकर, मनीषा लडकत, उदय लेले उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, कसबा नाव घेतल्यावर स्व. गिरीश बापट यांची आठवण होते. त्यांनी अनेक वर्ष या मतदासंघातील नेतृत्व केले आणि संसदेत गेले. त्यांनतर मुक्ता टिळक यांनी देखील घराण्याचा वारसा चांगला चालवला. केंद्र सरकार मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून पुण्यात गतीने विकास झाला. कसबा मध्ये भूमिगत मेट्रो तयार झाली असून मेट्रोचे शहरात विस्तारीकरण झाले. आधी बस व्यवस्था योग्य नव्हती पण आम्ही वातानुकूलित 1500 इलेक्ट्रिक बस मोठ्या प्रमाणात शहरात सुरू केल्या. पुण्याचे ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यासाठी एआय मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहे. पुण्यात येणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोडला चालना दिली गेली. प्रत्येक रस्त्यावर डबल डेकर रस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 54 हजार कोटी रुपये दिले आहे. नदी प्रकल्प सुशोभीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. नदी पात्रात केवळ निर्मळ पाणी राहील नदीत जाणारे सर्व पाणी सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यात येईल. पुण्यासाठी आणखी एक विमानतळ देण्यात येणार आहे. पुण्यात नवीन एसआरए नियमावली करण्यात आली. जुने वाडे पुनर्विकासात करण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment