कंगना म्हणाल्या- राहुल यांना भाषणासाठी कागद लागतो:पंतप्रधान कागद न पाहता तासभर बोलू शकतात

भाजप खासदार कंगना रनोट यांनी शनिवारी राहुल गांधींच्या भाषणाला उत्तर देताना सांगितले की पंतप्रधान मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेता आहेत. पण आपल्या देशातील विरोधक याला उपलब्धी म्हणुन पाहत नाहीत. पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर ते जळतात. त्या म्हणाल्या पंतप्रधान मोदी कागद न पाहता एक तास भाषण करु शकतात, तर राहुल यांना भाषण करण्यासाठी दर मिनिटाला स्लिप लागते. ते स्लिपशिवाय बोलु शकत नाही. आणि ते म्हणतात की पंतप्रधानांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. राहुल यांनी शिष्टाचार शिकावा. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील चंद्रपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी केली होती. राहुल म्हणाले- ‘मोदीजींची स्मरणशक्ती कमकुवत होत आहे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनाही स्मृतिभ्रंश आहे.’ राहुल म्हणाले की, माझ्या बहिणीने मला सांगितले की, आजकाल मोदीजी त्यांच्या भाषणात तेच बोलत आहे जे आम्ही बोलतो. कदाचित मोदीजींची स्मरणशक्ती कमी झाली असेल. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्षही भाषण करताना विसरायचे. बोलायचे एक असते आणि बोलता एक. तेव्हा मागुन त्यांना सांगण्यात येते की हे बोलायचे नव्हते. राहुल म्हणाले- पंतप्रधान आमच्या भाषणांची पुनरावृत्ती करत आहेत
मी प्रत्येक भाषणात संविधानाची प्रत घेऊन जातो, दाखवतो, असे म्हणत राहुल म्हणाले की, भाजप त्यावर हल्ला करत आहे. जेव्हा मोदीजींना समजले की लोकं संतापले आहेत, तेव्हा मोदीजी म्हणु लागले की राहुल गांधी संविधानावर हल्ला करत आहेत. मी प्रत्येक भाषणात म्हणतो की 50% आरक्षणाची भिंत पाडून आम्ही व्याप्ती वाढवू. लोकसभेत मी मोदीजींना सांगितले की, 50% आरक्षणाची भिंत जी तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करत नाही, ती आम्ही लोकसभेत तोडून दाखवू, पण त्यांची स्मरणशक्ती कमी झाली. राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढिल भाषणात म्हणतील की राहुल गांधी जातीय जनगणनेच्या विरोधात आहे. मी तर त्यांच्यासमोर म्हणालो होतो की, मोदीजी जातीय जनगणना करा. देशात किती दलित आहे, किती आदिवासी आहे आणि किती मागासवर्गीय आहे याचा शोध घ्यायला पाहिजे. देशाला त्यांच्या सहभागाची व्यापती कळायला हवी. प्रियांका शिर्डीत म्हणाल्या – एनडीएच्या खोटेपणाने जनता नाराज
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथे एका विराट सभेला संबोधित केले. त्या म्हणाल्या, ही ओसंडून वाहणारी गर्दी महाराष्ट्रातील जनता एनडीए सरकारच्या खोट्या वक्तव्याला कंटाळली असल्याची साक्ष देत आहे. भाजपचे लोक संविधानाची गोष्ट करतात, पण राज्यात संविधानाचे उल्लंघन कोणी केले? संविधान म्हणते की जनतेच्या हातात सर्वात मोठी शक्ती ही त्यांचे मत आहे आणि जनता त्यांच्या मताने आपले सरकार निवडेल, पण इथे काय झाले? प्रियांका यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे 1. भाजपने धमकावून महाराष्ट्र सरकारला चोरले
आधी जनतेने सरकारला निवडून दिले आणि नंतर पैशाच्या जोरावर, धमक्या देऊन आणि एजन्सींचा वापर करून सरकार चोरले. नरेंद्र मोदी आणि भाजपने येथील सरकार चोरून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला आहे. 2. मोदीजींनी अब्जाधीशांचे कोट्यवधींचे कर्जे माफ केले, पण शेतकऱ्यांचे नाही
भाजप सरकारच्या धोरणांनी शेतकरी, तरुण आणि महिलांसह प्रत्येक घटकाला कमकुवत करण्याचे काम केले आहे. नरेंद्र मोदींनी काही अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते ‘पैसे नाहीत’ असे म्हणतात. तर काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. 3. महाराष्ट्रातील रोजगार इतर राज्यात पाठवला गेला
महाराष्ट्रातील नोकऱ्या इतर राज्यात का पाठवल्या गेल्या? येथे २ लाख सरकारी पदे रिक्त आहेत, जी भरण्यात आलेली नाहीत. तरुण बेरोजगार आहेत, त्यांचा आत्मविश्वास गमावला आहे, त्यांना कोण उत्तर देणार? याचे उत्तर नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारला द्यावे लागेल. भाजप सरकार तुमच्याशी भेदभाव करत आहे. या सरकारने महाराष्ट्रातून सुमारे 10 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प इतर राज्यात पाठवले. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट, टाटा एअरबस मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ड्रग पार्क यासह अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आले. लाखो नोकऱ्या गेल्या. 4. मोदी सरकारच्या काळात देशात महागाई वाढली नरेंद्र मोदी मंचावरून येतात आणि म्हणतात, ते सरकार वेगळे होते, ‘आज मोदी आहे’. सत्य हे आहे की आज मोदी आहेत…म्हणूनच देशात महागाई आहे, महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, 10 वर्षांपासून सोयाबीनचे भाव वाढलेले नाहीत. शेतकऱ्यांसाठी काय केले? कृषी मालावर जीएसटी लावला. कांदा, कापूस, दूध, संत्रा या शेतकऱ्यांवर तुम्ही सर्व बाजूंनी हल्ला चढवला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात शेतकरी सुखी होता. त्यामुळेच आता जनतेला समजले आहे की ते सरकार वेगळे होते… ‘आज मोदी आहे’.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment