हिंगोलीतील सखी मतदान केंद्र गुलाबी रंगाने सजले:महिला कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोडही गुलाबी रंगाचे, मतदारांनी मतदानानंतर घेतली सेल्फी

हिंगोलीतील सखी मतदान केंद्र गुलाबी रंगाने सजले:महिला कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोडही गुलाबी रंगाचे, मतदारांनी मतदानानंतर घेतली सेल्फी

हिंगोली शहरातील सीटीक्लबच्या मैदानावरील सखी मतदान केंद्रावर बुधवारी ता. २० अल्हाददायक चित्र होते. मतदान केंद्र गुलाबी रंगाच्या फुग्यांनी सजविले होते तर केंद्रामध्ये गुलाबी पुष्पगुच्छ ठेवण्यात आले होते. तर या केंद्रावर नियुक्त केलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे ड्रेसकोड देखील गुलाबी रंगाचे होते. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचे स्वागत केले जात असल्याचे चित्र होते. या मतदान केंद्रावर अल्हाददायक चित्र पहावयास मिळाले. हिंगोली जिल्हयात यावर्षी प्रशासनाने १०१५ पैकी ५१५ मतदान केंद्रावर वेबकास्टींग केले आहे. या शिवाय ९ आदर्श मतदान केंद्रे उभारली होती. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचलित सखी मतदान केंद्र, दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे संचलित आदर्श मतदान केंद्र, आदर्श युवा मतदान केंद्र असे प्रत्येकी तीन मतदान केंद्राचा समावेश होता. हिंगोलीच्या सीटीक्लब मैदानावरील मतदान केंद्राच्या समोर गुलाबी रंगाच्या फुग्यांनी सजविण्यात आला होता. तसेच या ठिकाणी गुलाबी रंगाचा शामीयानाही उभारण्यात आला होता. तसेच मतदान केंद्राला गुलाबी रंगाच्या फुग्यांचे तोरण बांधण्यात आले होते. मतदान केंद्रात नियुक्त करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड देखील गुलाबी होता. मतदारांचे या ठिकाणी कर्मचाऱ्यांनीही उत्साहात स्वागत केले गेले. त्यानंतर बाजूलाच सेल्फी पॉईंट देखील गुलाबी रंगाचाच होता. त्यामुळे मतदान केंद्र चांगलेच आकर्षक बनले होते. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रंँम्पची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या पथकाने या मतदान केंद्रावर पाहणी केली. यावेळी त्यांनी सेल्फीही काढली. तसेच मतदारांनाही या ठिकाणी मतदान केल्यानंतर सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. सखी मतदान केंद्र मतदारांसाठी कौतूकाचा विषय बनले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment