व्यवसाय:महिलांना राग कमी, त्यामुळे बंगालच्या खास साड्या विणण्यात माहीर… 15 लाखांपर्यंतची ही साडी बनवण्यास लागतात 3 वर्षे
पश्चिम बंगालच्या हातमागावरील हलक्या आणि आरामदायक मलमलीच्या जामदानी साड्यांची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे या साड्यांची किंमत १५ लाख रुपयांपर्यंत गेली आहे. हातमागावर अशी साडी विणण्यासाठी ३ वर्षे लागतात. या कामात पुरुषांपेक्षांही महिला अधिक निपुण आहेत. नाजूक हातांनी कापसांपासून धागा खेचणे महिलाच चांगल्या प्रकारे करू शकतात. संत कबीर पुरस्काराने गाैरवलेले ज्योतिषपुत्र राजीव देबनाथ सांगतात की, मलमलीच्या जामदानी विणताना मन आणि डोके शांत असणे आवश्यक असते. रागात धागा तुटतो. धागा तुटला की आठवडाभराचे परिश्रम वाया जातात. महिलांना लवकर राग येत नाही. यामुळे पुरुषांपेक्षा अधिक चांगले काम करू शकतात. ६ वर्षे ६०० महिलांच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. मलमलीच्या साड्या कॅनडा, मलेशिया, दुबई, अमेरिका, ब्रिटनसह ६७ देशांत जातात. दिवसभरात होते केवळ १ सेंमी विणकाम सकाळ-संध्याकाळ होते विणकाम… राजीव सांगतात- सूत लवचिक बनवण्यासाठी विणकाम नदीकिनारी करण्यात येते. तेही सकाळी ऊन तापण्याआधी ४-५ तास व सायंकाळी सूर्यास्तापूर्वी ३-४ तास. हातमागाच्या खाली खड्डा असतो. त्यात माती भरण्यात येते. विणकर त्यावरच बसून विणकाम करतात. ओलाव्यासाठी हातमागाच्या वर बांबू-तृण लावण्यात येते. पुरुषांहून जास्त विणकाम महिलांचे फुला-पानांच्या प्रिंट… राजीव सांगतात की- जामदानीत जाम म्हणजे फूल आणि दानी म्हणजे कुंडी असते. मलमलीच्या जामदानी प्रिंटमध्ये फुले आणि पानांना महत्त्व दिले जाते. हे विणण्यासाठी बांधणी, पटोला, कांजीवरम आणि बनारसी साड्यांहूनही जास्त वेळ लागतो. आमच्याकडे ३-४ हजारांपासून ते १५ लाख रुपये किमतीच्या साड्या उपलब्ध आहेत.