हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक छळ; पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल:पतीकडून होणाऱ्या मारहाणीबाबत सासू-सासऱ्यानेही घेतली मुलाची बाजू

हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक छळ; पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल:पतीकडून होणाऱ्या मारहाणीबाबत सासू-सासऱ्यानेही घेतली मुलाची बाजू

चांदूर रेल्वे सासरच्या मंडळीने हुंड्यासाठी ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी पती हितेश महेंद्र तायवडे, सासरा महेंद्र बाबाराव तायवडे आणि सासू तसेच नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विवाहित पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ५ एप्रिल २०२१ रोजी तिचा विवाह व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या हितेश महेंद्र तायवडे (गगलानी नगर, वडाळी नाका) याच्याशी हिंदू विधीनुसार झाला होता. लग्नाआधी वर मुलगा आणि सासरच्यांनी सांगितले की, आमचे संयुक्त कुटुंब आहे. लग्नानंतर दोघांना राहण्यासाठी वडाळी नाका येथील साई-विला अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले राहिल्यानंतर पती दारू पिऊन रात्री उशिरापर्यंत यायचा, विनाकारण वाद घालायचा. पीडितेने हा प्रकार सासू-सासऱ्यांना सांगितल्यावर त्यांनी पतीची बाजू घेतली. माझ्या मुलाला तुझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल, तू अशीच आहे असे म्हणत सासू नेहमी हुंड्यासाठी टोमणा मारत असे. लग्नाच्या दीड वर्षांतच पती आणि मी त्याच कॉलनीतील दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. पती मित्रांना घरी बोलावून दारू, सिगारेट ओढत असे. या विषयावर बोलले असता मी असाच वागणार तुला माझ्या सोबत राहायचे असेल तर रहा असे त्याने वारंवार म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. पती नेहमी हुंड्यासाठी तगादा लावत असे. माझ्या वडिलांनी माझ्या पतीच्या खात्यावर अनेकदा पैसे पाठवले. असे असूनही त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. ते नेहमीच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायचे. दरम्यान नणंद व सासू या दोघीही माझ्या विरोधात पतीला चिथावणी देत मला मारण्यास भाग पाडत असे.​​ रात्री झोपल्यानंतर पती रात्री उशिरापर्यंत कोणाशी तरी मोबाइलवर चॅट करतो असेही तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी हुंडाबळी अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. मुलीच्या वडिलांचा मध्यस्थीचा प्रयत्न पीडित मुलीच्या वडिलांनी बरेचदा जावई हितेश तायवाडे, व्याही महेंद्र तायवाडे, विहीण मंजिरी तायवाडे, नणंद प्राजक्ता तायवाडे व मध्यस्थी नातेवाइकांना सोबत घेऊन बैठक, चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणताही तोडला निघत नसल्याने पीडितेने चांदूर रेल्वे पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment