राजस्थानमध्ये शाळकरी मुलांची बस उलटली, 3 ठार:ब्रेक फेल झाल्याने अपघात; पिकनिकला निघालेले 25 विद्यार्थी गंभीर जखमी
राजस्थानातील पाली जिल्ह्यात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, 25 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये ५५ मुले प्रवास करत होती. जिल्ह्यातील देसुरी नळ येथे रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास झालेल्या अपघाताचे कारण बसचे ब्रेक फेल असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 14 जखमींना देसुरी आणि 11 जणांना चारभुजा (राजसमंद) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस चारभुजा (राजसंद) येथून देसुरी (पाली) च्या दिशेने जात होती. त्यात रछिया (आमेट, राजसमंद) येथील महात्मा गांधी शाळेतील मुलांचा समावेश होता. ही मुले पालीच्या परशुराम महादेव मंदिरात दर्शन व सहलीसाठी जात होती. पंजाब मोड खोऱ्यात बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. बस अपघाताशी संबंधित फोटो…