आमदारकीची शपथ घेताच प्रश्नांची उकल:7 वर्षांपासून रखडलेले दिगाव फिडरचे काम सुरु करा; आमदार संजना जाधव यांच्या सूचना

आमदारकीची शपथ घेताच प्रश्नांची उकल:7 वर्षांपासून रखडलेले दिगाव फिडरचे काम सुरु करा; आमदार संजना जाधव यांच्या सूचना

कन्नड तालुक्यातील शेलगाव उपकेंद्रातील दिगाव फेडर चे काम सात वर्षांपासून रखडलेले असून ते काम त्वरित मार्गी लावावे अशा सूचना नवनिर्वाचित आमदार संजना जाधव यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे छत्रपती संभाजी नगरचे अधीक्षक अभियंता यांना लेखी पत्रद्वारे दिले आहे. आ. संजना जाधव यांनी आमदारकीची शपथ घेताच तालुक्यातील जनतेच्या शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले आहे. सत्कार वगैरे स्वीकारण्यापेक्षा तालुक्यातील कामांना प्रधान्यक्रम देऊन ज्या दिवशी आमदारकीची शपथ घेतली त्याच दिवशी कामाला सुरुवात केली आहे. विद्युत वितरणच्या अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की,कन्नड तालुक्यातील शेलगांव येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे काम सन २०१७ मध्ये पुर्ण झालेले असुन उपकेंद्र कार्यान्वित झालेले आहे. याच उपकेंद्रा अंतर्गत दिगांव फिडरचेही काम जवळपास सात वर्षांपासुन रखडलेले आहे. त्यामुळे दिगाव,खेडी येथील विजपंपाना केवळ तीन ते चार तासच वीजपुरवठा होत असल्याने शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेलगांव ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत दिगाव फिडरचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सोबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उलट टपाली त्वरित अवगत करावे अशा सूचना केल्या आहेत. एकूणच आ.संजना जाधव यांनी हर तुरे स्वीकारण्यापेक्षा जनतेच्या कामाला महत्व दिले असून पहिल्याच दिवसापासून शेतकरी,जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य दिले असल्याने त्यांच्या कामाच्या पद्धतिची चुणूक दाखवील्याने सर्व विभागांना देखील या कामाची दखल घेऊन अलर्ट रहावे लागेल हे निश्चित आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही दिव्य मराठी प्रतिनिधीशि बोलतांना आ.संजना जाधव म्हणाल्या की, “शुभेच्छा सत्कार आशीर्वाद यात कार्यकर्त्यांच्या भावना दडलेल्या असतात त्यांचा स्वीकारच आहे.मात्र विकास कामे,जनतेचे प्रश्न समस्या निकाली काढण्यासाठी प्राधान्यक्रम असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही.”

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment