दिव्य मराठी अपडेट्स:दादर रेल्वे स्थानकात असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस, आज आदित्य ठाकरे भेट देणार
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स दादर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस, आज आदित्य ठाकरे भेट देणार मुंबई – दादर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस रेल्वे प्रशासने दिली होती. यावरून उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे हे मंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे आता या मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. उत्तरेतील थंड वाऱ्याचा वेग मंद, राज्यात थंडीत घट; तापमानात 2 अंशांनी वाढ नाशिक – राज्यात काही ठिकाणी गारठा वाढला तर काही ठिकाणी हुडहुडी वाढली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग काहीसा मंदावल्यामुळे व अरबी समुद्रातील प्रवाहबदलांमुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश शहरांचे सरासरी किमान तापमान 2 अंशांनी वाढून 10 ते 12 अंशांच्या दरम्यान हाेते. नाशिकमध्येही त्यात 2.2 अंशांनी वाढ हाेऊन शुक्रवारी 11.9 अंश इतके किमान तापमान नाेंदवले गेले. त्यामुळे थंडीचे प्रमाण थाेडे कमी झाल्याचे चित्र आहे. येत्या दाेन दिवसांमध्ये हेच वातावरण कायम राहील, असा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. अमरावतीच्या मुसैबची ‘एनआयए’कडून दुसऱ्या दिवशीही कसून चौकशी सुरूच अमरावती – जैश माेहंमद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएच्या पथकाने गुरुवारी (12 डिसेंबर) पहाटे अमरावतीमधील मो. मुसैब शे. इसा (23) याला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी दिवसभर चौकशी करून सायंकाळी घरी सोडले होते. दरम्यान, शुक्रवारी (13 डिसेंबर) सकाळी साडेनऊ वाजेपासून त्याची पुन्हा चौकशी सुरू असून शुक्रवारी रात्री साडेसात वाजेपर्यंत ही चौकशी सुरूच होती. जवळपास 25 तासांच्या चौकशीनंतरही एनआयए ठोस निष्कर्षाप्रत पोहोचले किंवा नाही, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मो. मुसैब शे. इसा हा मागील काही महिन्यांपासून एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असावा तसेच त्यांच्यासोबत सोशल मीडिया ग्रुपवर तो सहभागी असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळेच ‘एनआयए’ने गुरुवारी पहाटे देशभरात टाकलेल्या छाप्यांपैकी एक छापा मो. मुसैबच्याही घरी टाकला. मो. मुसैबच्या घरातून काही कागदपत्रे व त्याचा मोबाइलसुद्धा जप्त केला आहे. मात्र त्याचा दहशतवादी संघटनेमध्ये सहभाग आहे किंवा नाही, हे मात्र शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत समोर आले नव्हते. याबाबत एनआयएचे अधिकारी किंवा स्थानिक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. आमदार योगेश टिळेकरांच्या मामाच्या खून प्रकरणात धुळ्यात एक ताब्यात धुळे – भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा व पुणे येथील व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात धुळ्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ यांचे 9 डिसेंबरला सकाळी कारमधून अपहरण केले होते. त्यानंतर वाहनामध्ये तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर शिंदवणे घाटातील ऊरळी कांचन परिसरात त्यांचा मृतदेह टाकून मारेकरी पसार झाले होते. अक्षय जावळकरला ताब्यात घेतले आहे. पैठण – ज्ञानेश्वर उद्यान खुले करण्यावरआजच्या बैठकीत होणार शिक्कामाेर्तब पैठण – येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सुरूकरण्यात येणार असून अनेक वेळा सुरू करण्याचामुहूर्त हुकल्यानंतर अखेर सोमवारी किंवा मंगळवारीउद्यान पर्यटकांसाठी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यातयेईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारीअभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. या संदर्भातीलआढावा घेण्यासाठी खासदार भुमरे यांच्या उपस्थितीतआज शनिवारी सकाळी 11 वाजता उद्यानात बैठकहाेणार आहे. याच बैठकीत उद्यान सुरू करण्याच्यामुहूर्तावर शिक्कामाेर्तब केला जाणार आहे. शाळा इमारतीसाठी कर्मचाऱ्यांचे पैसे घेऊन 47 लाखांत फसवणूक परभणी – जिंतूर येथे शाळेच्या इमारतीसाठीसंस्थेतील कर्मचाऱ्यांकडून पैसेजमवून इमारत बांधलीच नाही.तसेच जुने नियुक्ती आदेशपत्रवापरुन, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतफसवणूक केल्याचा प्रकार समोरआला आहे. या प्रकरणी जिंतूरपोलिस ठाण्यात दोघांवर 12डिसेंबरला फसवणुकीचा गुन्हादाखल झाला. नारायण पवार यांनी तक्रार दिलीआहे. फिर्यादी हे संस्थेचे अध्यक्षआहेत. संस्थेअंतर्गत विश्वकर्मानिवासी अस्थिव्यंग विद्यालय जिंतूरयेथे ते कार्यरत आहेत. या ठिकाणीसेवेवर असलेल्या एका कलाशिक्षिका व त्यांच्या पतीनेफसवणुकीचा प्रकार केला आहे.संस्थेसाठी जागा घेऊन इमारतबांधण्यासाठी, कर्मचाऱ्यांनाविश्वासात घेऊन त्यांच्या जवळून46 लाख 70 हजार रुपये घेतले.तसेच एकाकडून 6 लाख रुपये घेतत्याला संस्थेत नियुक्ती देण्याचेअामिष दाखविले. जुना मुद्रांकवापरुन नियुक्ती आदेश देतफसवणूक केली. या प्रकरणी उत्तमकुंटूरकर, कल्पना कोटरवार यादोघांवर जिंतूर पोलिसातफसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.पोलिस पुढील तपास करत आहेत.या घटनेत फसवणूक झालेल्याशाळेच्या कर्मचाऱ्यांची संख्यावाढण्याची शक्यता, पोलिसांनीव्यक्त केली आहे.
एटीएममधून ईपीएफओची 50% रक्कम काढता येणार नवी दिल्ली – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ग्राहकांना बँकिंगसारखी सेवा देण्याच्या योजनेवर काम करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन तरतुदींनुसार, भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) एकूण ठेव रकमेपैकी 50% रक्कम एटीएमसारख्या कार्डद्वारे काढता येणार आहे. केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांनी बुधवारी ही सेवा पुढील वर्षापासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली होती. केंद्रीय कामगार सचिव डावरा यांनी शुक्रवारी सांगितले की मृत ईपीएफओ सदस्यांच्या वारसांना एटीएमद्वारे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) च्या दाव्याची रक्कम काढण्याची सुविधा देखील मिळेल. मासिक पगार रु. 15,000 पेक्षा जास्त असल्यास उपलब्ध कमाल 7 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळते. जर वेतन 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर बोनस इत्यादी जोडल्यानंतर रक्कम 5.5 लाख रुपयांपर्यंत मिळते. आता असे पैसे काढण्यासाठी समर्पित कार्ड दिले जाऊ शकते. ईडीच्या छाप्यानंतर पत्नीसह व्यावसायिकाची आत्महत्या आष्टा-सिहोर – मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील व्यापारी मनोज परमार व त्यांची पत्नी नेहा यांनी शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी हे कुटुंब नालखेडा येथे माँ बगलामुखीचे दर्शन घेऊन घरी परतले होते. मुलांना झोपवल्यानंतर जोडप्याने दुसऱ्या घरात जाऊन गळफास घेतला. ईडीने 8 दिवसांपूर्वी मनोज यांच्या घरावर छापा टाकला. बनावट कागदपत्रांद्वारे 6 कोटी कर्ज घेतल्याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू होती. भारत जोडो यात्रेदरम्यान परमार यांच्या मुलांनी राहुल गांधींना पिगी बँक भेट दिली होती. त्यामुळे ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आरजी करच्या माजी प्राचार्याला जामीन कोलकाता – प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील एका न्यायालयाने शुक्रवारी आरजी कार रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष व माजी पोलिस अधिकारी अभिजित मंडल यांना जामीन मंजूर केला. वस्तुत: सीबीआय 90 दिवसांत त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करू शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने घोष व मंडल यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. मंडल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास कथित विलंब केल्याचा आरोप होता. तर घोष यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप होता. महिलेवर सामूहिक अत्याचार, 8 जण अटकेत गुवाहाटी – आसाममधील गुवाहाटी येथील मंदिर परिसरात एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आठ आरोपींना अटक केली. त्यांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान आहे. एक आरोपी फरार आहे. ही घटना गोरचुक परिसरात घडली. गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दिगंत बराह यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे एका पत्रकाराकडून सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ मिळाला होता. व्हिडिओच्या तपासणी आधारे पोलिसांच्या पथकांनी गोरचुक व जळुकबारी ठाणे हद्दीत छापे टाकत अारोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. व्हीआयपी दर्शनाबाबत, जानेवारीमध्ये सुनावणी नवी दिल्ली – मंदिरांमध्ये व्हीआयपी दर्शनासाठी लागू शुल्काविरुद्धच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात जानेवारी 2025 मध्ये सुनावणी होईल. ही प्रथा कलम 14 व 21 अंतर्गत राज्यघटनेचे उल्लंघन करणारी आहे, असे याचिकेत नमूद केले.