मविआने भाजपच्या कोणत्या नेत्याला जेलमध्ये टाकायचे ते ठरवले होते:मात्र, जनतेने त्यांना जागा दाखवली; रावसाहेब दानवेंची टीका

मविआने भाजपच्या कोणत्या नेत्याला जेलमध्ये टाकायचे ते ठरवले होते:मात्र, जनतेने त्यांना जागा दाखवली; रावसाहेब दानवेंची टीका

राज्यात महाविकास आघाडीने सत्ता आल्यानंतर कोणाला जेलमध्ये टाकायचे हे देखील ठरवले होते. मात्र राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडीचा पराभव केला असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. लोकसभेत विरोधी पक्षातील उमेदवार जिंकले. मात्र त्यानंतर आघाडीने विधानसभा निवडणुकीमध्ये असे वातावरण तयार केले की, आता आमचे 200 आमदार निवडून आल्याशिवाय राहत नाही. मंत्री कोणाला करायचे हे देखील त्यांनी ठरवले होते. इतकेच नाही तर कोणत्या मंत्राला कोणते खाते द्यायचे, हे पण त्यांनी ठरवले होते. तसेच भाजपच्या कोणत्या नेत्यांना जेल मध्ये टाकायचे हे देखील त्यांनी ठरवले होते, अशी टीका देखील दानवे यांनी केली आहे. महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, या पराभवाचे कारण त्यांना शोधता येत नसल्यामुळेच विरोधक ईव्हीएमला दोष देत असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे. राजकारणामध्ये एक तर ‘कन्फ्युज’ करावे लागते किंवा ‘कन्व्हेन्स’ करावे लागते. मात्र महाराष्ट्रातील जनता मविआतील नेत्यांना ‘कन्व्हेन्स’ करता आली नाही. त्यामुळे त्यांनी ‘कन्फ्युज’ करण्याचे काम केले असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोन्ही पक्ष आता शिल्लक राहणार नसल्याचा दावा देखील रावसाहेब दानवे यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाने देखील अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. अनेकदा पराभव स्विकारावा लागला आहे. मात्र आम्ही ईव्हीएमवर शंका व्यक्त करत बसलो नाही. लोकसभा निवडणुकीत देखील आमचा पराभव झाला. कर्नाटकामध्ये आमचा पराभव झाला, हरियाणा मध्ये देखील आमचा पराभव झाला होता. मात्र आम्ही कधीही ईव्हीएम वर आरोप केले नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment