रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?:बावनकुळेंच्या मंत्रिमडळ प्रवेशाने चर्चांना उधाण; राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनाही डच्चू?

रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?:बावनकुळेंच्या मंत्रिमडळ प्रवेशाने चर्चांना उधाण; राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनाही डच्चू?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. पण रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन न आल्याने ते पक्ष-संघटनेत प्रदेशाध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावल्याने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संघटनांवर वर्चस्वासाठी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. 2024 मध्ये चौथ्यादा डोंबिवलीतून आमदार झालेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावर ज्या ज्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली त्या निवडणुकीत भाजपला त्यांनी विजय मिळवून दिला आहे. अनेक दिग्गजांना अजून फोन नाही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आल्याचे समोर आले आहे. तर आता अजित पवार गटाच्या शिलेदारांच्या यादीत अद्याप धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचे नाव नाही तर दुसरीकडे भाजपच्या यादीत रवींद्र चव्हाण यांना स्थान देण्यात आले नसल्याने आता या नेत्यांना पक्ष संघटनेत संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून काही नेत्यांना डच्चू राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होते. परंतु, अद्याप त्यांना पक्षाकडून फोन आला नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळांची वर्णी लागणार का?, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीकडून 5 जणांना फोन गेले असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अद्याप वेटिंगवर आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment