देवेंद्र पर्व 3.0 मध्ये 4 लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी:भाजपच्या पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंची वर्णी

देवेंद्र पर्व 3.0 मध्ये 4 लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी:भाजपच्या पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंची वर्णी

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. भाजपच्या तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला आमदाराला मंत्रिपदासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडून फोन आला आहे. भाजपकडून विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे, जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी मंत्रिपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रायगड श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकच महिला मंत्री होती. त्यानंतर आता चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये एकूण 20 महिला आमदार आहेत. त्यापैकी 4 महिलांना मंत्रिपद देण्यात येणार आहेत. पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा संधी पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. 2014 मध्ये युती सरकामध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे महिला व बालविकास खाते देण्यात आले होते. 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांना चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पक्षाने त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावली होती. 2024 मध्ये पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. माधुरी मिसाळ पहिल्यांदा होणार मंत्री माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. त्या 2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग चार वर्षे विजय मिळवला आहे. सलग चार वर्षे आमदार होणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या महिला आमदार आहेत. परभणीला 14 वर्षांनंतर मंत्रिपद भाजप आमदार मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यांच्या रुपाने परभणी जिल्ह्याला 14 वर्षांनंतर मंत्रिपद मिळणार आहे. यापूर्वी महिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी परभणी जिल्ह्यातून मंत्रीपद भूषवले होते. आता त्यांच्यानंतर महिला प्रतिनिधी म्हणून आमदार मेघना बोर्डीकर यांची वर्ण लागली आहे. आदिती तटकरे सलग दोन वेळा मंत्री होणार आदिती तटकरे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेल्या. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते. माहिती आणि जनसंपर्क खात्याचा कारभार दिला होता. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्या अजित पवारांसोबत गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे महिला व बालविकास खाते देण्यात आले. याच काळात त्यांच्या खात्याकडून महायुती सरकारची महत्वकांक्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. आदिती तटकरे 2024 मध्ये दुसऱ्यांना आमदार झाल्या असून त्यांची यंदाही मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची माहिती आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment