मंत्रिमंडळ विस्तारावरुन छगन भुजबळ नाराज?:नागपुरातील पक्ष मेळाव्याला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण

मंत्रिमंडळ विस्तारावरुन छगन भुजबळ नाराज?:नागपुरातील पक्ष मेळाव्याला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण

महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरमध्ये होत आहे. एकूण 39 आमदार आज मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे नाव नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्याला छगन भुजबळ उपस्थित नसल्याने या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांकडून ऐनवेळी धनंजय मुंडे यांना संधी मिळाली. अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा नागपूर येथील देशपांडे हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडत आहे. सर्व आमदारांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी बोलवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित आहेत. मात्र, या कार्यक्रमाला छगन भुजबळ गैरहजर आहेत. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना फोन राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपच्या वाट्याला 20, शिवसेनेच्या वाट्याला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे. नागपूर येथे हा शपथविधी सोहळा पार पडेल. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदासाठी आज सकाळपासून पक्षाच्या वरिष्ठांनी फोन करून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले. नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे यांच्यासह नाशिकच्या सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा समावेश असल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment