उपनगराध्यक्षाचा मुलगा ते 6 वेळा आमदार:विकास कामांसह आरोग्य क्षेत्रात विशेष कार्य, मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास

उपनगराध्यक्षाचा मुलगा ते 6 वेळा आमदार:विकास कामांसह आरोग्य क्षेत्रात विशेष कार्य, मंत्री हसन मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज नागपूर येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. कागल मतदारसंघात विकास कामांसह आरोग्य क्षेत्रातही विशेष कार्य केले आहे. शस्त्रक्रिया करणारा आमदार अशी त्यांची मतदारसंघात ओळख आहे. जाणून घ्या हसन मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास…. हसन मुश्रीफ यांचा जन्म 24 मार्च 1954 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कालग तालुक्यात झाला. कागलचे पहिले उपनगराध्यक्ष मियालाल (बापुजी) रसूल मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे वडील होत. हसन मुश्रीफ यांनी 1974 मध्ये शिवाजी विद्यापीठातून बी.ए चे शिक्षण घेतले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कागलच्या हिंदुराव विद्या मंदिरातून झाले. त्यांच्या पत्नीचे नाव साहिरा मुश्रीफ असून त्यांना साजिद आणि नाविद दोन मुले आहेत. अल्पसंख्यांक समाजाचे नेते अशी ओळख हसन मुश्रीफ हे 40 वर्षांहून अधिक काळापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात असून त्यांची अल्पसंख्यांक समाजाचे नेते अशी ओळख आहे. ते 19 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शाहू कारखान उभारला. 1985 च्या दरम्यान राजकारणात सक्रीय हसन मुश्रीफ यांची सुरुवातीला कागलचे लोकनियुक्त उपनगराध्यक्ष मियालाल मुश्रीफ यांचा मुलगा अशी ओळख होती. 1985 च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये राजकारणात सक्रीय झाले. ते सुरुवातीला काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास सुरू झाला, तो आजपर्यंत कायम आहे. पोटनिवडणुकीत झाला होता पराभव
1998 मध्ये सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतर कागलच्या विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यावेळी अवघ्या एका वर्षासाठी कागलची पोटनिवडणूक झाली. यावेळी हसन मुश्रीफ यांना संधी मिळाली. परंतु, या निवडणुकीत मुश्रीफ यांना पराभव स्वीकारावा लागला. ते सात हजार मतांनी पराभूत झाले. त्यानंतर 1999 मध्ये ते पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी त्यांनी साडेतीन हजार मतांनी विजय मिळवत विधानसभा गाठली. मोदी लाटेतही गड राखला कायम
1999 पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग सहा वेळा आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. विशेष म्हणजे 2014 मध्ये मोदी लाटेत अनेक दिग्गजांचे गड ढासाळले असताना देखील, मुश्रीफ यांनी कागलचा गड राखला होता. शरद पवारांची सोडली साथ
1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. हसन मुश्रीफ हे शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले. तेव्हापासून ते त्यांच्यासोबतच होते. मात्र, जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांनी बंड करत शरद पवारांना धक्का दिला आणि भाजप-शिवसेनेसोबत युती सरकारमध्ये सहभागी झाले. यावेळी हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांसोबत गेले. विकास कामांसह आरोग्य क्षेत्रात विशेष कार्य
हसन मुश्रीफ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विकास कामांसह आरोग्य क्षेत्रात विशेष कार्य केले. विधी व न्याय मंत्री असताना त्यांनी सरकारी रुग्णालयात गरजू आणि गरीब रुग्णांसाठी 10 टक्के जागा राखवी ठेवण्याचा कायदा केला.’लोकांच्या तोंडाकडे न पाहता त्यांच्या पायाकडे पाहत येणाऱ्या प्रत्येक गरजूला मदत करायची’ असे मुश्रीफ सांगतात. हसन मुश्रीफ यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया आमदार असेही म्हटले जाते. हसन मुश्रीफ यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात जलसंपदा, विधी व न्याय, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास, शिक्षण, कामगार, ग्रामविकास अशी महत्त्वाची खाती सांभाळली. तसेच जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संस्थेत मजबूत पकड असल्याने त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. हसन मुश्रीफ यांची कारकीर्द थोडक्यात विकास कामांच्या माध्यमातून मिळवली लोकप्रियता मुश्रीफ यांच्यावरील भष्ट्राचाराचे आरोप नेमके कोणते

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment