नवीन टॅगिंगमुळे पशुगणनेला विलंब:जिल्ह्यात आतापर्यंत 16 टक्के पशुगणना, 395 पशुगणना, फेब्रुवारीपर्यंत गणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट‎

नवीन टॅगिंगमुळे पशुगणनेला विलंब:जिल्ह्यात आतापर्यंत 16 टक्के पशुगणना, 395 पशुगणना, फेब्रुवारीपर्यंत गणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट‎

राज्यात सुरू असलेल्या २१ पशुगणनेंतर्गत जिल्ह्यातील २४५९ गावांपैकी ३९५ गावांमध्ये पशू मोजणीला सुरूवात झाली आहे. गाय व म्हैसवर्गीय पशुंच्या टॅग क्रमांकाची नोंद घेतली जात आहे. ज्या पशुंना टॅग नाही, त्यांना टॅगिंगही केले जात आहे. एकाचवेळी टॅगिंग व गणना काम सुरू असल्याने, गणनेला विलंब होत असून जिल्ह्यात १६ टक्के गणना पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपासून पशुगणना सुरू झाली. राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, संस्था गोशाळा यांच्याकडे आढळणाऱ्या १६ प्रजातीच्या गायवर्गीय, म्हैसवर्गीय, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा आदी प्राण्यांची मोजणी केली जात आहे. यासाठी ५५० प्रगणक आणि ११० पर्यवेक्षक काम करीत आहेत. ही मोजणी २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. २०१० पासून पशुंना टॅर्गीग क्रमांक देण्यास सुरूवात झाली. आता गणना करताना हे टॅग नसल्याने संबंधित पशुपालकाच्या नावे यापूर्वी टॅंगिंगवर किती पशु होते व सद्यस्थितीत किती आहेत, याची पडताळणी करून माहिती नोंदवली जात असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. ज्या पशुंना टॅग नाही, त्यांना रिटॅगिंगही केले जात आहे. यामुळे विलंब होत आहे. कळवण तालुक्यात जनावरांना टॅगिंग करताना पशुसंर्धन कर्मचारी. पशुगणनेसाठी प्रगणकांना गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन तपासणी करावी लागत आहे. ज्या नागरिकांकडे पशुधन आहे त्या नागरिकांकडे शेत शिवार फिरून पाहणी करावी लागत असल्याने उशीर होत आहे. ^ नाशिक जिल्ह्यात टॅगिंगप्रमाणे गणना सुरू असून, गाय व म्हैसवर्गीय पशुचे रिटॅगिंग सुरू आहे. त्यामुळे एकाच गावात गणना करणाऱ्या कर्मचाऱ्याला दोन तीन दिवस लागतात. कुटुंबाकडे असलेल्या पशुंची यापूर्वीची संख्या व सध्याची संख्या याचीही पडताळणी होत आहे. फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. – डॉ. प्रशांत धर्माधिकारी, उपायुक्त, पशुसंवर्धन

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment