दिव्य मराठी अपडेट्स:जीएसटी कौन्सिलमध्ये आज महत्त्वाचा निकाल; तर शेअर बाजार पाच सत्रांत 4092 अंकांनी काेसळला
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स जीएसटी कौन्सिलमध्ये आज महत्त्वाचा निकाल जैसलमेर – जीएसटी कौन्सिलची 55 वी बैठक शनिवारी जैसलमेर येथे होऊ घातली आहे. त्यात जीवन, आरोग्य विमा हप्त्यांवरील करात घट करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. महागड्या घड्याळी, बुट यावर कर वाढवण्याचा विचार सुरू आहे. महाकुंभ : भुसावळमार्गे धावणार 4 रेल्वेगाड्या जळगाव – प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यासाठी पश्चिम रेल्वेकडून भाविकांसाठी चार विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे भुसावळमार्गे धावणार असून चारही रेल्वेच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे गर्दी कमी हाेऊन भाविकांची गैरसाेय दूर हाेईल. रेल्वे क्र. 09019 वलसाड-दानापूर ही रेल्वे 8, 17, 21, 25 जानेवारी आणि 8, 15, 19 आणि 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.40 वाजता वलसाड येथून निघेल. तर दुस-या दिवशी दानापूरला पोहचेल. 09020 दानापूर-वलसाड ही रेल्वे 9, 18, 22, 26 जानेवारी आणि 9, 16, 20 आणि 27 फेब्रुवारी रोजी दानापूर येथून रात्री साडेअकरा वाजता निघेल. तिसच्या दिवशी वलसाडला पोहचेल. 09021 वापी-गया ही रेल्वे 9, 16, 18,20, 22, 24 जानेवारी आणि 7, 14, 18, 22 फेब्रुवारीला धावणार आहे. 09022 गया-वापी ही रेल्वे 10, 17, 19, 21, 23, 25 जानेवारी व 8, 15, 19, 23 फेब्रुवारीला गया येथून धावणार आहे. या चारही रेल्वेंना वलसाड, भुसावळ, खंडवा, इटारसी येथे थांबा आहे. पटोलेंना हवी भारत जोडोतील अर्बन नक्षली संघटनांची यादी नागपूर – राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत काही अर्बन नक्षली संघटना सहभागी झाल्या होत्या असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील केला. त्या अर्बन नक्षली संघटनांची व त्या संघटनेच्या प्रमुखांची यादी द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात विविध सामाजिक संघटना अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कामे करत असून राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत आहेत. राज्यात व देशात लोकशाही भक्कम व्हावी यासाठी अशा संघटना कार्यरत आहेत. अशा सामाजिक संघटनांसह विचारवंत, ज्येष्ठ नागरिकही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. अशा संघटनांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादी संबोधणे अत्यंत चुकीचे आहे. पुण्यात जिमच्या तरुणांना स्टेरॉइड इंजेक्शनची विक्री; दोघांवर गुन्हा पुणे – पुणे शहरातील विविध जिममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना शरीरयष्टी चांगली व्हावी यासाठी स्टेरॉइड इंजेक्शन मेफेटर्मिन सल्फेट बेकायदा विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातून 5 हजार रुपयांचे बेकायदा 14 स्टेरॉइड इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. दीपक बाबुराव वाडेकर (32) व साजन अण्णा जाधव (25, दोघेही रा. पुणे ) अशी आरोपींची नावे आहेत. संबंधित आरोपी नतावाडी येथील इराणी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कारमध्ये बेकायदा स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे 14 इंजेक्शन सापडले. दोघांनीही हे इंजेक्शन कुणाकडून आणले, याचा पोलिस आता तपास करत आहेत. मुंबईत वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी सजवला ख्रिसमस ट्री नाताळचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर आकांक्षा फाऊंडेशने शुक्रवारी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना एका प्रदर्शनात नेले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी ख्रिसमस ट्री सजवला. नायलाॅन मांजामुळे मुलाचा कापला गेला कान; पडले 12 टाके येवला – शहर व परिसरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असून या घातक नायलॉन मांजाने एका बालकाचा कान कापल्याची धक्कादायक घटना येवल्यात घडली आहे. निमगाव मढ येथे तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या मनीषा इगवे ह्या मुलगा सार्थक (वय 7,रा. येवला) याला गुरुवारी सायंकाळी सुमारास दुचाकीवरून घेऊन जात होत्या. शहरातील फत्तेबुरुज नाका परिसरात सार्थकच्या डोक्यात मांजा अडकल्याने त्याचा कान कापला गेला.त्याला जखमी अवस्थेत येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले असून कानाला झालेली जखम मोठी असल्याने जवळपास 12 टाके पडले असल्याची माहिती डॉ. स्वप्निल शहा यांनी दिली. मसला शिवारात महसूल प्रशासनाने केली कारवाई; 35 ब्रास वाळू जप्त करततराफा, 3 छावण्या नष्ट परभणी – गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसाकरणाऱ्या माफियांच्या तीन छावण्या,एक तराफा महसूलच्या पथकाने नष्टकेला. तहसीलदार उषाकिरण श्रृंगारेयांच्या पथकाने मसला शिवारातून 35ब्रास वाळू, फावडे, टोपले असेसाहित्य जप्त केले आहे. कारवाई करून सुद्धा गोदावरी नदीपात्रातून मसला शिवारात होतअसलेला अवैध वाळू उपसाथांबलेला नाही. त्यामुळे उपविभागीयअधिकारी जिवराज डापकर यांच्यामार्गदर्शनाखाली नायब तहसीलदारआशोक केंद्रे, मंडळ अधिकारीशंकर राठोड, महसूल हसूलसहाय्यक गणेश सोडगीर, तलाठीसंतोष इप्पर आदींनी गुरुवारी सकाळी9 वाजेपासून ते सायंकाळीउशिरापर्यंत मसला शिवारातगोदावरी नदीपात्रात पाहणी केली.विविध ठिकाणी धडक कारवाई करतवाळू उपसा करण्यासाठी असलेलाएक तराफा, तसेच गोदावरी नदीकाठावरील तीन छावण्या नष्टकेल्या. तसेच 35 ब्रास वाळूचा साठाचार ठिकाणी केलेला आढळला. हीवाळू जप्त केली. 29 व्या आंतरराष्ट्रीयजल परिषदेचे उद्घाटन पुणे – केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आणि इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हायड्रॉलिक्स, वॉटर रिसोर्सेस, रिव्हर आणि कोस्टल इंजिनिअरिंग – हायड्रो 2024 इंटरनॅशनल’ या 29 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. तीनदिवसीय परिषदेमध्ये हायड्रोलिक्स, जलस्रोत, नदी अभियांत्रिकी आणि किनारपट्टी व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर आमंत्रित व्याख्याने, संशोधन पेपर सादरीकरण करण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्रातर्फेनैसर्गिक शेतीचा उपक्रम हिंगोली – तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक कृषीअभियानातून, 50 हेक्टर क्षेत्रावरनैसर्गिक शेतीचा कार्यक्रम राबवलाजाणार आहे. कळमनुरी तालुक्यातीलनैसर्गिक शेतीची आवड असणाऱ्याशेतकऱ्यांनी उपक्रमात सहभागीहोण्यासाठी, ग्रामपंचायतीचा ठरावआणि यादी सादर करावी. नैसर्गिकशेतीची क्षमता पाहून त्यांच्या गावाचीनिवड केली जाईल. तसेच यादीतप्रथम येणाऱ्या गावांना प्राधान्य दिलेजाणार असल्याचे तोंडापूर कृषीविज्ञान केंद्राकडून कळवण्यात आलेआहे. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातूननवीन पिकांचे उत्पादन, उत्पादनासाठीबाजारपेठ, एकात्मिक कीड नियंत्रणया बाबींचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनकरण्यात आले. जंगलात उभ्या कारमध्ये 54 किलो सोने, 9.86 कोटींची रोकड सापडली भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील मेंडाेरीच्या जंगलात एका बेवारस इनोव्हा कारमध्ये 54 किलो सोने आणि 9.86 कोटी रुपये रोख रक्कम सापडली आहे. आरटीओ असे लिहिलेली ही गाडी लोकायुक्त पोलिस परिवहन विभागाचे माजी हवालदार सौरभ शर्मा यांच्या ठावठिकाण्याचा शोध घेत असताना सापडली. चेतन गौरच्या नावावर हे वाहन नोंदणीकृत आहे. याबाबत लोकायुक्त पोलिसांनी अद्याप कोणताही दावा केलेला नाही.
त्याच वेळी प्राप्तिकर विभागाचे पथक याला आपली कारवाई असल्याचे सांगत आहे. जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित तपासासंदर्भात आयकर विभाग तीन दिवसांपासून रिअल इस्टेट व्यावसायिकांच्या ठिकाणांची झाडाझडती घेत आहे. त्याच परिसरात हे वाहन सापडले आहे. सायबर गुन्हे: आता कॉलर ट्यूनद्वारे जनजागृती होणार नवी दिल्ली – सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणे पाहता आता कॉलर ट्यूनच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दूरसंचार विभागाने दूरसंचार ऑपरेटरना 3 महिन्यांसाठी दररोज 8-10 वेळा सायबर क्राईम जागरूकता कॉलर ट्यून प्ले करण्याचे निर्देश दिले आहेत. ही कॉलर ट्यून गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (अाय4सी) द्वारे प्रदान केली जाईल. हा ऑडिओ प्री-कॉल अनाउंसमेंट/रिंग बॅक टोनद्वारे प्ले केला जाईल. 15 नोव्हेंबरपर्यंत केंद्राने 6.69 लाखांहून अधिक सिम कार्ड आणि 1,32,000 आयएमईआय केंद्राने ब्लॉक केले आहेत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रियंका गांधींच्या खासदार निवडीला कोर्टात आव्हान कोची – भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी शुक्रवारी प्रियंका गांधी यांच्या खासदार निवडीला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले. प्रियंका गांधी यांनी आपली व कुटुंबाची संपत्ती योग्यरित्या उघड केली नाही. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत चुकीची माहिती दिली. त्यांची निवड रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे. झाकीर हुसेन यांच्यावर अंत्यसंस्कार; शिवमणींची ड्रम वाजवून श्रद्धांजली सॅन फ्रान्सिस्को – प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसिद्ध तालवादक शिवमणी आणि इतर कलाकारांनी ड्रम वाजवून त्यांना आदरांजली वाहिली. झाकीर हुसेन यांचे 73 व्या वर्षी सोमवारी सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय 73 वर्षे होते. ते इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. शिवमणी म्हणाले, “लयच ईश्वर आहे आणि तुम्ही आमच्यासाठी तेच आहात झाकीर भाई.’