गुलाबराव देवकर भाजप प्रवेशासाठी प्रयत्न करताय:नकली गुलाबरावांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- गुलाबराव पाटील

गुलाबराव देवकर भाजप प्रवेशासाठी प्रयत्न करताय:नकली गुलाबरावांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- गुलाबराव पाटील

अजित पवार गटामध्ये प्रवेश मिळत नसल्याने गुलाबराव देवकर भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. तर गुलाबराव देवकर हा नकली गुलाबराव आहे, त्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढणार. गुलाबराव पाटील म्हणाले की, कॅबिनेट मंत्री कोणत्याही खात्याचा असला तरी त्याला प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो. कोणतेच खाते हे हलकं फुलकं नसते, काम करणारा माणसाला कोणत्याच गोष्टीची गरज नसते. जनतेची कामे करण्याकरता तशी मानसिकता असली पाहिजे. आपण लोकांमध्ये फिरलो पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. जुनेच खातं पुन्हा मिळाले गुलाबराव पाटील म्हणाले की, माझ्याकडे पूर्वी असलेलं खातच पुन्हा मला मिळाला आहे. राज्यात पाणीपुरवठाच्या योजना या काही प्रमाणात पूर्ण झाल्या असून काही अद्याप प्रलंबित आहेत. पाच वर्षाच्या काळात पाणीपुरवठा योजनेचा मला अनुभव असल्याने प्रलंबित असलेल्या योजनांना गती मिळेल. ग्रामीण पाणीपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो, त्यामुळे माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून मला हे खाता देण्यात आले याचा आनंद आहे. पाणीपुरवठा खात्यात मला पुण्याचा काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करणार गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यात काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठ्याच्या पाणीपुरवठा योद्धांची कामे हे संथ गतीने सुरू आहे. जी काम थांबले आहे, त्यांना ब्लॅक लिस्ट करून ती पुन्हा कशी सुरू करता येतील यासाठी मी प्रयत्न करणार. देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यातील 3 जणांना संधी मिळाली आहे. यात भाजपचे 2 तर शिवसेनेच्या एका मंत्र्यांचा समावेश आहे.गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण), संजय सावकारे – टेक्सटाईल, गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment