मुंबईत SUV ने 3 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले:फूटपाथजवळून जात असताना दिली धडक, 19 वर्षीय कार चालकाला अटक

मुंबईत SUV ने 3 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले:फूटपाथजवळून जात असताना दिली धडक, 19 वर्षीय कार चालकाला अटक

मुंबईत क्रेटा चालवणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने 3 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले, या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरुष वडाळा असे मृत मुलाचे नाव आहे. वडाळा परिसरातील आंबेडकर कॉलेजजवळील फूटपाथवर त्यांचे कुटुंब राहत होते. शनिवारी तो फूटपाथजवळून पायी जात होता. दरम्यान, भरधाव वेगात क्रेटा चालवणाऱ्या तरुणाने आपली कार आरुषवर चढवली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भूषण संदीप गोळे असे आरोपीचे नाव आहे. तो विलेपार्ले येथील रहिवासी आहे. अपघाताबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. आरोपी दारूच्या नशेत होता की नाही, तपास सुरू पोलिसांनी सांगितले की, आरोपी भूषण संदीप गोले याला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तो दारू पिऊन गाडी चालवत होता की नाही, याचा तपास सुरू आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. चौकशीनंतरच माहिती दिली जाईल. 12 दिवसांपूर्वी मुंबईत बसने 30 जणांना चिरडले होते
8 डिसेंबर रोजी मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसने सुमारे 30 जणांना चिरडले होते. यामध्ये चौघांचा मृत्यू तर 26 जण जखमी झाले होते. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे हा अपघात झाला. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीला जात होती. देशात 5 वर्षांत रस्ते अपघातात 7.77 लाख लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रात 66 हजार

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment