आईकडे जावे की बापाकडे जावे अशी परिस्थिती:आम्हाला अजित पवार आणि छगन भुजबळ दोघेही पाहिजेत, हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया

आईकडे जावे की बापाकडे जावे अशी परिस्थिती:आम्हाला अजित पवार आणि छगन भुजबळ दोघेही पाहिजेत, हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया

महायुतीचे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर त्यात अनेक आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करून दाखवली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपदावरून डावलण्यात आले. यावरून भुजबळ यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर आता आमदार हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिरामण खोसकर म्हणाले, मी परवा छगन भुजबळ यांना भेटणार आहे. त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही दोघे वरिष्ठ नेत्यांनी एकत्र राहिले पाहिजे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना छगन भुजबळ देखील पाहिजे आणि अजित पवार देखील पाहिजेत. आमची परिस्थिती ही आईकडे जावे की बापाकडे जावे अशी झाली आहे. दोघेही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. पुढे बोलताना हिरामण खोसकर म्हणाले, अजित पवारांची तयारी आहे. छगन भुजबळ यांची समजूत काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ यांना मंत्री पद नको आहे, अशी चर्चा ही चुकीची आहे. छगन भुजबळ यांचा पुनर्वसन नक्की होईल, छगन भुजबळ यांच्यावरील अन्याय खोडून काढावाच लागेल. केंद्रातील निधी आणण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासारखा भक्कम नेता केंद्रात आवश्यक आहे. अजित पवार सुनील तटकरे प्रफुल पटेल हे एकत्र बसून त्यांना न्याय देतील. माणिकराव कोकाटे यांना कृषिमंत्री पद मिळण्यावर देखील हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिरामण खोसकर म्हणाले, जिल्ह्याला दोन मंत्री पद दिली. त्यातील एक पद म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा कृषिमंत्री पद शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोकाटे यांच्या रूपाने चांगले नेतृत्व दिले. इगतपुरीतून देखील मी निवडून आलो त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. जिल्ह्यातील सातही जागा निवडून आल्यामुळे अजितदादा हे समाधानी आहेत. तसेच दोन मंत्र्यांच्या रूपाने नाशिकची जिल्हा बँकेचा प्रश्न देखील निकाली लागेल असा विश्वास हिरामण खोसकर यांनी केला आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही यावरून आता राजकारणातील कट्टर विरोधक माणिकराव शिंदे यांनी भुजबळ यांना खोचक टोला लगावला आहे. माणिकराव शिंदे म्हणाले, सरकार येऊन सरकारमध्ये नसणे हा भुजबळ यांचा मोठा अपमान आहे. नियतीला कदाचित सरकार येऊन सरकारमध्ये नसणे हा मोठा अपमान त्यांना द्यायचा होता म्हणून कदाचित येवलामध्ये त्यांना विजय मिळाला. त्यांची लढत कशी झाली हे जनतेला माहीत आहे, असा खोचका टोला माणिकराव शिंदे यांनी लगावला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment