महाराष्ट्रात फडणवीस सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर:बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी हर्षदीप कांबळे; कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे, पाहा लिस्ट
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून खातेवाटप देखील पूर्ण झाले आहे. आता राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. तसेच हर्षदीप कांबळे यांची बेस्ट महाव्यवस्थापक पदावर बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजेनकोच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंची नाशिक महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्यात आता प्रशासकीय बदल करण्यास सुरुवात झाली असून या अंतर्गत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे