शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणार:कठोर कायदा केला जाईल, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणार:कठोर कायदा केला जाईल, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. तसेच नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचे देखील यावेळी माणिकराव कोकाटे यांनी म्हंटले आहे. नाशिक येथे त्यांनी संवाद साधला त्यावेळी ही घोषणा केली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, आम्ही जोपर्यंत कायदा तयार करत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांच्या नावांची यादी करता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या व्यापाऱ्यांना शेत माल विक्री करावा याबाबतची यादी करता येत नाही. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी कारवाई कशी करावी याबाबतचा निर्णय पोळी दलातील अधिकाऱ्यांनी घ्यावा, अशा सूचना देखील माणिकराव कोकाटे यांनी दिल्या आहेत. पुढे बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, कृषी खाते संवेदनशील असून मी त्याच्या दुप्पट संवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे फोन उचलले जातील, कारवाई केले जातील, न्याय दिला जाईल. तसेच वेळ पडल्यास गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. याशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर कायदा केला जाईल, असे कोकाटे यांनी म्हंटले आहे. माणिकराव कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा आगामी मार्च महिन्यात आणला जाईल. नाशिक येथे व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकरी आणि पोलिस प्रशासनाच्या बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही घोषणा केली आहे. या बैठकीला विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर कायदा केला जाईल. मंत्रिमंडळात विषय मांडला जाईल. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापऱ्यांना वेगळी वागणूक देतात याबाबतचे प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील यावेळी बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment