शाही स्नान केल्यानंतर हृदयविकाराचा झटका:शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचा कुंभमेळ्यात मृत्यू, सोलापूरवर शोककळा

शाही स्नान केल्यानंतर हृदयविकाराचा झटका:शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचा कुंभमेळ्यात मृत्यू, सोलापूरवर शोककळा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाले. ते प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. कुंभमेळ्यात शाही स्थान केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. शरद पवार यांचे निकटवर्तिय म्हणून महेश कोठे यांची ओळख होती. कुंभमेळ्याच्या पर्वावर निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या निधनानंतर सोलापूर शहरावर शोककळा पसरली आहे. आमदार देवेंद्र कोठे हे महेश कोठे यांचे पुतणे होत. प्रयागराज येथे सोमवारपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली. या कुंभमेळ्यासाठी महेश कोठे आपल्या काही मित्रांसोबत गेले होते. मंगळवारी सकाळी शाही स्नान करण्यासाठी गेले. स्नान करून बाहेर पडल्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयान नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. विमानाने पार्थिव आणण्यात येणार
सोलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश कोठे यांची ओळख होती. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र,त्यांचा पराभव झाला होता. शहराच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपल्याची संवेदना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. विमानाने त्यांचे पार्थिव सोलापुरात आणण्यात येणार आहे. महेश कोठे यांचा राजकीय प्रवास
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये यंदाच्या वर्षीचा कुंभमेळा होत आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत कुंभमेळा होत आहे. दर तीन वर्षांनंतर एकदा अशा पद्धतीने 12 वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री कुंभमेळा भरत असतो. यंदाच्या वेळी हा कुंभमेळा प्रयागराज येथे होत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment