दिव्य मराठी अपडेट्स:गोऱ्हेंसह 8 आमदार अपात्रता: सभापती राम शिंदे आजपासून याचिकांवर सुनावणी करणार

दिव्य मराठी अपडेट्स:गोऱ्हेंसह 8 आमदार अपात्रता: सभापती राम शिंदे आजपासून याचिकांवर सुनावणी करणार

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स गोऱ्हेंसह 8 आमदार अपात्रता: आजपासून सुनावणी होणार मुंबई – तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या तीन आणि शरद पवारांना सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झालेल्या पाच विधान परिषद सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर नवनियुक्त विधान परिषदेचे सभापती राम शिंदे गुरुवारपासून या याचिकांवर सुनावणी करणार आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे, विप्लव बाजोरिया आणि मनीषा कायंदे यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अशीच याचिका सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, अमोल मिटकरी आणि विक्रम काळेंविरुद्ध दाखल केली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना अपात्र ठरवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांची याचिका आहे. वाल्मीकच्या समर्थनार्थ‎ आंदोलन, 5 गुन्हे दाखल‎ बीड‎ – कराडवर मकोका लावल्यानंतर‎मंगळवारी परळी व केज तालुक्यात‎याचे पडसाद उमटले होते. कराडच्या‎समर्थनार्थ आंदोलन करून रस्त्यावर‎टायर जाळण्यात आले होते, तर एका‎बसवर दगडफेकही केली होती.‎याप्रकरणी अज्ञातांविरोधात पाच गुन्हे‎नोंद करण्यात आले आहेत.‎ कराडवर मकोका लावल्याची‎माहिती मिळताच परळी शहरात याचे‎पडसाद उमटले. कराड समर्थक‎आक्रमक झाले होते. त्यांनी आंदोलन‎सुरू केले होते. पांगरी कॅम्प भागात‎वाण नदी पुलावर व टोकवाडी येथे‎रस्त्यावर टायर जाळले गेले होते.‎याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांत‎पोलिस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या‎तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा‎नोंद करण्यात आला.‎ दिल्ली संमेलनात अण्णा भाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी सांगली – नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ज्ञानपीठ व भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव करण्याची मागणी पुरोगामी संघर्ष समितीने केली आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी आपल्या कारकिर्दीत याबाबत केंद्र सरकारशी संपर्क साधून अण्णा भाऊ साठे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिले आहे. वाळू वाहतुकीबाबत कायद्यानुसार‎ कारवाई करावी : खंडपीठाचे निर्देश‎‎ छत्रपती संभाजीनगर – अवैध वाळू‎वाहतुकीबद्दल बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी‎वाहनधारकांना कोट्यवधी रुपयांच्या दंडाच्या‎नोटिसा बजावल्या होत्या. या संदर्भात मुंबई उच्च‎न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. किशोर‎संत यांच्या खंडपीठात सुनावणी सुरू होती. त्यामध्ये‎बजावलेल्या नोटिसा मागे घेण्यात आल्या. भविष्यात‎कायदेशीर तरतुदींचे पालन करून अवैध वाळू‎वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्याचा आदेश‎खंडपीठाने बीड जिल्हाधिकाऱ्यांना दिला.‎ पाडळशिंगी येथील टोलनाक्यावरून‎वाहनधारकांनी या टोलनाक्यावरून प्रत्येक वेळी 6‎ब्रासपेक्षा अधिक वाळूचे नियमबाह्य उत्खनन आणि‎वहन केले. त्यासंदर्भात वाहनधारकांना‎कोट्यवधींच्या दंडाच्या नोटिसा बजावल्या होत्या.‎यासंदर्भात अमोल गरड यांनी दंडाचे आदेश रद्द‎करण्याची विनंती केली होती. त्यांच्या वाहनाने‎अवैध वाळू वाहतूक केली नाही, भरारी पथकाने‎कारवाई व पंचनामा केला नाही , असे त्यांचे म्हणणे‎होते. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड.विजयकुमार‎सपकाळ, ॲड. तौसिफ सय्यद, सरकारतर्फे‎ॲड.अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले.‎
दुचाकी चोरीच्या संशयावरून‎एकास पोलिसासमोर मारहाण‎ नांदेड‎ – दुचाकी चोरीच्या संशयावरून नीटची‎तयारी करणाऱ्या 18 वर्षीय‎‎विद्यार्थ्याला‎‎पोलिस‎‎कर्मचाऱ्याच्या‎‎मित्राने पोलिसाच्या‎‎समक्ष मारहाण‎‎केली. शहरातील‎‎श्रीनगर‎‎परिसरातील एका‎वसतिगृहात ही घटना घडली. या‎मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला‎आहे. या प्रकरणी भाग्यनगर‎पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्यासह‎तिघांवर मंगळवार, 14 रोजी गुन्हा‎दाखल केला असून पोलिस‎कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात‎ आले आहे.‎ आसोली (ता.माहूर) येथील‎प्रथमेश पुरी हा विद्यार्थी श्रीनगर‎भागातील एका वसतिगृहात राहून‎नीट परीक्षेची तयारी करत आहे. 5‎जानेवारीला सकाळी एसआरपीएफ‎कॉन्स्टेबल आकाश सावंत, क्षितिज‎कांबळे व श्रावण असे तिघे‎वसतिगृहात आले. मोटारसायकल‎आणि सोन्याची चेन चोरी केली का?‎असे विचारून क्षितिज कांबळेने‎पोलिसांच्या काठीने वळ उमटेपर्यंत‎प्रथमेशला मारहाण केली.‎मारहाणीदरम्यान त्याच्या तोंडात‎रुमाल कोंबला होता.‎ आरटीईतून पूर्व प्राथमिकचे ‎3 वर्ग वगळले : मनसे‎ परभणी‎ – शिक्षण विभागाला अंधारात ठेवून‎परभणीतील शिक्षण संस्था आरटीई‎25 टक्के प्रवेशासाठी पात्र पूर्व‎प्राथमिकचे तीन वर्ग वगळण्यात‎आल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण‎सेनेने केली आहे. योग्य ती कार्यवाही‎न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा‎इशारा निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी‎प्राथमिक जिल्हा परिषद यांना देण्यात‎आला आहे.‎ आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू‎करण्यात आली आहे. पूर्व‎प्राथमिकच्या तीन वर्षांसाठी‎बालकांची वयोमर्यादा व अन्य‎नियमावली निश्चित केली आहे. परंतु‎काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील‎काही शिक्षण संस्था जाणूनबुजून पूर्व‎प्राथमिक वर्गासाठी नोंदणी करत‎नाहीत, अशी तक्रार मनसेने केली.‎ हायकोर्टाने मागितला धार्मिक स्थळ लाऊडस्पीकरचा अहवाल मुंबई – राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर 2,940 बेकायदा ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) लावण्यात आल्याचा तपशील सरकारी यंत्रणांनीच माहिती अधिकारांत याचिकाकर्त्यांना उपलब्ध केला होता. त्यामुळे या बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह पोलिस महासंचालकांना केली. तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
तीन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरवर आक्षेप घेत आंदोलन केले होते. शिंदे सरकार स्थापन झाल्यावर आंदोलन गुंडाळण्यात आले आहे. धार्मिक स्थळांवरील बेकायदा ध्वनिक्षेपकांवरील कारवाईबाबत उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2016 मध्ये आदेश दिले होते. मात्र, या आदेशांचे पालन केले जात नसल्याचे नवी मुंबईतील रहिवासी संतोष पाचलाग यांनी अवमान याचिकेद्वारे निदर्शनास आणून दिले. तसेच, राज्यभरातील विविध धार्मिक स्थळांवर 2940 बेकायदा ध्वनिक्षेपक लावण्यात आल्याचा तपशील माहिती अधिकारांत देण्यात आल्याचेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. मुंबईसह 7 विमानतळांवर इमिग्रेशन प्रक्रिया वेगवान नवी दिल्ली – गुरुवारपासून देशातील आणखी 7 विमानतळांवर जलद इमिग्रेशन प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन – ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम’चे (एफटीआय-टीटीपी) उद्घाटन करतील. दिल्लीनंतर आता ही सुविधा मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचीन आणि अहमदाबाद विमानतळांवर उपलब्ध होणार आहे. इमिग्रेशन प्रक्रिया सुलभ झाल्याने विमानतळावरून बाहेर पडताना वेळ वाचणार आहे. वंदे भारत, तेजससाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता नवी दिल्ली – केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत (एलटीसी) अंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफर ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार आता राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या गाड्यांव्यतिरिक्त केंद्रीय सरकारी कर्मचारीही पात्रतेनुसार तेजस, वंदे भारत आणि हमसफर एक्स्प्रेससारख्या गाड्यांमध्ये प्रवास करू शकतील. सराफ पिता-पुत्र आत्महत्या; दाेघांचा व्हिसेरा राखीव नाशिक – सराफ व्यावसायिक प्रशांत गुरव व त्यांचा मुलगा अभिषेक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात शवविच्छेदनात प्रशांत यांनी आम्लयुक्त विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समाेर आले, तर अभिषेक याच्या मृत्यूचे नेमके कारण समाेर आले नसून ते पडताळण्यासाठी पंचवटी पाेलिसांनी पिता-पुत्राचे ‘व्हिसेरा’ राखून ठेवत ताे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयाेगशाळेत पाठवला आहे. पाेलिसांनी सराफ व्यावसायिकेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेत त्याची पडताळणी सुरू केली असून कुटुंबीयांकडून तक्रार प्राप्त हाेताच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. साेमवारी सराफ बाजारातील व्यावसायिक प्रशांत आत्माराव गुरव (49) आणि मुलगा अभिषेक (29, रा. रामराज्य संकुल, पंचवटी) यांचे घरातच सकाळी मृत्यू झाल्याचे आढळून अाले.
दावोसमध्ये बैठकीत देवयानी पवार करणार भारताचे प्रतिनिधित्व पुणे – येत्या 20 ते 24 जानेवारीदरम्यान स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या वार्षिक बैठकीत तरुण उद्योजिका व ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या बारामती हबच्या सदस्या असलेल्या देवयानी पवार यांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या जगभरातील 50 प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासाठी निवडलेल्या 2 भारतीयांपैकी देवयानी पवार या एक आहेत हे विशेष. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक उपक्रम असून या अंतर्गत जगभरातील युवक हे आपापल्या भागातील स्थानिक, प्रादेशिक यांबरोबरच जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. आज जगभरात ग्लोबल शेपर्स कम्युनिटीचे 500 हून अधिक स्थानिक सक्रिय विभाग आहेत. पोलिस ठाण्यात महिला पोलिसांना धक्काबुक्की पुणे – खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करून कोंढवा पोलिस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. तसेच पोलिस ठाण्यातील प्रिंटर आपटून नुकसान केले. याप्रकरणी फाल्गुनी कुमारन पिल्ले (18), कुमारन जयराम पिल्ले (48), शीतल कुमारन पिल्ले (46), तसेच एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गुन्ह्यात फाल्गुनीला पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले होते. फाल्गुनी, तिचे वडील कुमारन, आई शीतल आणि 14 वर्षांचा भाऊ कोंढवा पोलिस ठाण्यात आले. त्यांनी ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिस उपनिरीक्षकाशी हुज्जत घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की केली. बालकामगाराचा पडून मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर – वेल्डिंग काम करताना उंचावरून पडून एका बालकामगाराचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी मक्तेदार सिकंदर सैपन शेख (32, रा. किसान संकुल) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात मार्केट यार्डात घडला. आयान रफिक हेब्बल (17 वर्षे 10 महिने, रा. किसान संकुल, अक्कलकोट रोड) असे मृत मुलाचे नाव आहे. आयान यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी असताना त्यास वेल्डिंग कामासाठी ठेकेदार सिकंदर शेख यांनी मार्केट यार्डात घेऊन गेला. त्यास सुरक्षा साहित्य पुरवले नाही. उंचावर काम करताना पडून गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेल रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार डेरे तपास करत आहेत. पोलिस ठाण्यात महिला पोलिसांना धक्काबुक्की पुणे – खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करून कोंढवा पोलिस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. तसेच पोलिस ठाण्यातील प्रिंटर आपटून नुकसान केले. याप्रकरणी फाल्गुनी कुमारन पिल्ले (18), कुमारन जयराम पिल्ले (48), शीतल कुमारन पिल्ले (46), तसेच एका अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गुन्ह्यात फाल्गुनीला पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले होते. फाल्गुनी, तिचे वडील कुमारन, आई शीतल आणि 14 वर्षांचा भाऊ कोंढवा पोलिस ठाण्यात आले. त्यांनी ठाण्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिस उपनिरीक्षकाशी हुज्जत घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की केली. गलवान व्हॅली, डोकलाम सारख्या 77 युद्धभूमी पर्यटनासाठी खुल्या पुणे – भारतीय सैन्याच्या अदम्य शौर्याचे साक्षीदार असलेले रणांगण जवळून पाहायचे असेल तर येथे भेट देण्यासाठी तयार व्हा. भारतीय लष्कर गलवान व्हॅली, डोकलाम, सियाचीन बेस कॅम्प, लिपुलेख पास, बुमला पास या 8 राज्यांतील 77 युद्धक्षेत्रे पर्यटनासाठी खुली करणार आहे. याच्याशी संबंधित वेबसाइट bharatrannbhoomidarshan.gov.in बुधवारी 77 व्या लष्कर दिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लाँच करण्यात आली. ही वेबसाइट वन स्टॉप सोल्युशन म्हणून काम करेल.
इथे फेरफटका मारताना काही माहिती आणि कागदपत्रांची विचारणा केली जाईल. ती सादर होताच रणांगणावर जाण्याची परवानगी दिली जाईल. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेअंतर्गत सैनिकांनी अदम्य धैर्य दाखवलेल्या युद्धक्षेत्रांना भेट देऊन पर्यटकांना भौगोलिक अडचणी जवळून अनुभवता येणार आहेत. या उपक्रमामुळे या दुर्गम भागात पर्यटन तर वाढेलच, शिवाय स्थानिक समुदायांना आर्थिक फायदाही होईल. येथे येणाऱ्या पर्यटकांना शौर्यपत्र दिले जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे गलवान व्हॅली तेच ठिकाण आहे जिथे जून 2020 मध्ये भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिले होते. 2017 मध्ये डोकलाममध्येही अशीच परिस्थिती होती. या ठिकाणी पोहोचणाऱ्या पर्यटकांना गाइडची सुविधाही मिळणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment