धनंजय मुंडेंचा परळीत जनता संवाद:जगमित्र कार्यालय गजबजले, नियमित प्रमाणे प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन

धनंजय मुंडेंचा परळीत जनता संवाद:जगमित्र कार्यालय गजबजले, नियमित प्रमाणे प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन

नियमित प्रमाणे परळीत आल्यानंतर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील आपल्या जगमित्र या कार्यालयामध्ये बसून मतदारसंघातून व मतदारसंघ बाहेरून आलेल्या नागरिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत त्यांची कामे अडचणी समजून घेतल्या तसेच ती मार्गी लावण्याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देत संबंधितांची कामे मार्गी लावली. जागच्याजागीच काम मार्गी लावण्याचा शैलीमुळे धनंजय मुंडे यांच्या जनता संवाद उपक्रमास नेहमीच गजबजलेली गर्दी पाहायला मिळते. आजही धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात दाखल झाल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर परळी व परळी बाहेरील नागरिकांनी जगमित्र हे धनंजय मुंडे यांचे कार्यालय गजबजलेले पाहायला मिळाले. मंत्री धनंजय मुंडे हे परळीत असल्यानंतर नियमित प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनाला जातात. आजही घराबाहेर पडतात त्यांनी सर्वप्रथम बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन करून विधिवत पूजन केले व त्यानंतर ते जनता संवाद उपक्रमासाठी त्यांच्या जगमित्र या कार्यालयात दाखल झाले. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचा असलेला वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विरोधकांकडून तसेच महायुतीमधीलही काही नेत्यांनी व आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच त्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे. आता यावर धनंजय मुंडे काय निर्णय घेतात किंवा पक्ष प्रमुख अजित पवार काय निर्णय देतात याकडे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment