भूमिका बदलण्याच्या आरोपाचा राज ठाकरेंकडून समाचार:भाजपच्या भूमिकांची जंत्रीच वाचली; मनपा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना

भूमिका बदलण्याच्या आरोपाचा राज ठाकरेंकडून समाचार:भाजपच्या भूमिकांची जंत्रीच वाचली; मनपा निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे कायम भूमिका बदलतात, असा आरोप भारतीय जनता पक्षाकडून केला जात होता. या आरोपाचा समाचार राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात घेतला. पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आतापर्यंत भारतीय जनता पक्ष यांनी किती वेळा भूमिका बदलली याबाबत राज ठाकरे यांनी पाढाच वाचला. जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून तर आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने किती वेळा भूमिका बदलली, याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्हणजेच पर्यायने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुका या स्वबळावर लढवल्या. त्यात आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज्यात चर्चा सुरू आहे. यावर देखील राज ठाकरे वारंवार आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी सडेतोड उत्तर देण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. काही कामे चांगले केले तर त्याला चांगले आणि वाईट केले तर त्याला वाईट म्हटले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण, विखे पाटील अशी अनेकांची नावे यावेळी राज ठाकरे यांनी जनता दलाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने कशा भूमिका बदलल्या याचा पाढाच वाचला. यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या पुलोद सोबत देखील सरकार स्थापन केले होते. तसेच जम्मू-काश्मीरमधील अमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या नावाचा देखील राज ठाकरे यांनी उल्लेख केला. तेव्हापासून आजपर्यंत अशोक चव्हाण, विखे पाटील असे अनेकांची नावे राज ठाकरे यांनी यावेळी घेतली. ज्यांच्यावर आरोप होतो ते नंतर भाजपसोबत येतात, असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला आहे. या वेळी त्यांनी किरीट सोमय्या यांचा देखील उल्लेख केला. ईडीची नोटीस आणि राज ठाकरेंची भूमिका राज ठाकरे यांच्यावर ईडीची चौकशी लागल्यामुळे ते भारतीय जनता पक्षासोबत गेले असल्याचा आरोप केला जात होता. याला देखील राज ठाकरे यांनी उत्तर दिले. या संदर्भात राज ठाकरे यांनी कोहिनूर मिल संदर्भातली आपली भूमिका देखील स्पष्ट केली. या संदर्भात आपण सरकारचा थकबाकी दाखवत असलेला कर डबल भरला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे अशा कोणत्याही नोटीशीवरुन राज ठाकरे हे भूमिका बदलणार नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात देखील राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला लांबला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सध्या जास्त खर्च न करण्याचा सल्ला दिला आहे. आताच सर्व खर्च करताल आणि नंतर मात्र रिकाम्या खिश्याने माझ्यासमोर येताल, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी भूमिकेसंदर्भात भाजपवर केलेले आरोप पहा…. राज ठाकरे म्हणाले की,

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment