फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका बसायला सुरुवात:तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका बसायला सुरुवात:तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली आहे. यातच पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून तापमान वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार आहेत. मुंबई आणि किनारपट्टी भागात तसेच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पार हा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातच संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळया जाणवणार असून किमान आणि कमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलाच उघडा जाणवणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ गेल्या काही दिवसांपासून राज्यात किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. यात आता तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 5 फेब्रुवारी रोजी पुणे आणि राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. तर किमान तापमान देखील 15 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमानात वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पहाटेचा गारवा काही प्रमाणात कमी झाला असून सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाच्या तीव्र झळया जाणवत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उकाडा जाणवणार उत्तर बांगलादेशासह ईशान्य भारतातील आसाम आणि परिसरात चक्राकार वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हिमालयाच्या भागात देखील नव्याने पश्चिमी चक्रवात सक्रिय होणार आहे. त्यामुळे उत्तरेत दाट धुक्याची चादर आणि प्रचंड थंडी जाणवत आहे. त्यातच राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातील काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र कोरडे आणि शुष्क वातावरण राहील. त्यातच पावसाची शक्यता नसल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागात उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment